Umarkhed Firing : उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा गोळीबारात मृत्यू

author img

By

Published : Jan 11, 2022, 6:32 PM IST

Updated : Jan 11, 2022, 7:36 PM IST

Umarkhed Firing News

उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे ( Fire On Dr Hanumant Dharmakare ) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गोळीबारात ( Dr Hanumant Dharmakare Death In Firing ) त्यांचा मृत्यू झाला आहे.

यवतमाळ - उमरखेड येथील श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे ( Fire On Dr Hanumant Dharmakare ) यांच्यावर अज्ञात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील उमरखेड-पुसद रोड ( Umerkhed Pusad Road ) वरील उत्तरवार रुग्णालयाच्या समोरच ५ वाजताच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात डॉ. धर्मकारे यांचा मृत्यू ( Dr Hanumant Dharmakare Death In Firing ) झाला आहे. उमरखेड-पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने डॉक्टरवर चार गोळ्या झाडल्या. हे अज्ञात हल्लेखोरांनी नेमके कोण होते आणि त्यांच्या गोळीबार करण्यामागे काय कारण होते, हे अद्याप अस्पष्ट आहे.

हत्येमुळे शहरात चर्चेला पेव -

डॉ. हनुमंत धर्मकारे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचा उमरखेड बसस्थानकाच्या समोर खासगी बाल रुग्णालय आहे.
गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे. याशिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला. यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे.

नागरिकांनी रुग्णालयात केले दाखल -

शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी बैठक असते. सायंकाळी ५ वाजताच सुमारास आपल्या मोटर सायकल ते त्यांच्या खासगी दवाखानाकडे जात असताना एक अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्या, त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी थारोळ्यात पडलेला डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली यावेळी नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात गर्दी केली.

उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती -

विशेष म्हणजे आज माझी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील हे उमरखेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनाही ही घटना समजली, त्यांनी यावेळी घटनास्थळी भेट दिली. विशेष म्हणजे मागील आठ दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती असताना त्यातच उमरखेड पोलीस बंदोबस्तात असताना सुद्धा भर रस्त्यावर हा गोळीबार झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांचा असंतोष होत आहे.

हेही वाचा - Rekha Kamat Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन; माहिममध्ये घेतला अखेरचा श्वास

Last Updated :Jan 11, 2022, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.