महाराष्ट्र

maharashtra

Banner War : 'सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व'; राज ठाकरेंचे व्यंगचित्र बूमरँग

By

Published : Apr 19, 2022, 12:08 PM IST

Updated : Apr 19, 2022, 12:46 PM IST

अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेने त्याच राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे व्यंगचित्र मनसेवर बूमरँग झाल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरेंचे व्यंगचित्र
राज ठाकरेंचे व्यंगचित्र

मुंबई/पुणे- राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे सध्या आक्रमक झाले आहेत. नुकतेच आयोध्या दौऱ्यावर जाण्याची राज यांनी घोषणा केली. मात्र, ज्या अयोध्यावरून राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेने त्याच राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे व्यंगचित्र मनसेवर बूमरँग झाल्याचे दिसून येत आहे.

पोस्टरबाजी

मनसेवर बूमरॅंग - गुढीपाडव्या मेळाव्यापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे कूच केल्याचे दिसत आहे. मशिदीवरील भोंगे असो किंवा हनुमान चालीसा पठणवरून मनसे आक्रमक झाली आहे. एरवी भगवी शाल कधीही परिधान न करणारे राज ठाकरे पुण्यात केलेल्या महाआरतीवेळी शाल पांघरलेले पाहायला मिळाले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना हिंदू जननायक अशी पदवी बहाल केली. अनेक ठिकाणी तसे बॅनर लावण्यात आले. येत्या पाच मे रोजी राज ठाकरे यांनी आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरून शिवसेनेनेही राज ठाकरे यांनीच काढलेल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोध्या दौऱ्यावर गेले असताना राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आसूड ओढला होता. हेच व्यंगचित्र शिवसेनेने वायरल करत मनसेला फटकारले आहे.

राज ठाकरेंचे व्यंगचित्र

काय म्हटलंय शिवसेनेने -'अशी वेळ कोणावरही येऊ नये, उद्धव साहेब ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जाणार आहेत. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व...' अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा - Soniya Gandhi Letter : केंद्र सरकारविरोधातील पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी नाही; महाविकास आघाडीत संभ्रम

राज यांचे व्यंगचित्र -'अहो, देश खड्ड्यात घातला आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! लोकांनी तुमच्याकडे 'राम राज्य' मागितले होते. 'राम मंदिर' नव्हे...! या व्यंगचित्रातून एका बाजूला राम लक्ष्मण चिंताग्रस्तेत तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या व्यक्तीरेखा साकारून टीकास्त्र सोडले होते.

पोस्टरबाजी

पुण्यातील पोस्टरबाजी चर्चेत - पुण्यात थेट राज ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनर्समध्ये राज ठाकरे यांनी स्वत:चे काढलेले व्यंगचित्र दाखवण्यात आले असून अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं म्हणण्यात आलंय. हे बॅनर्स कोणी लावले याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनाच त्या दौऱ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असं या फ्लेक्सवर लिहिण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करून देणारे फ्लेक्स शहरातील विविध भागात लावण्यात आल्याने सध्या शहरात फ्लॅक्सचीच चर्चा सुरू आहे.

Last Updated :Apr 19, 2022, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details