महाराष्ट्र

maharashtra

MLC Election 2022 Voting : शिवसेना राज्यसभेतील पराभवाचा 'असा' काढणार वचपा

By

Published : Jun 20, 2022, 8:27 AM IST

-राज्य विधानपरिषदेच्या ( Bhai Jagtap in MLC election ) १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार तर आघाडी सरकारचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. मतांचा कोटा गाठण्यासाठी छोटे पक्ष, अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र, खरी लढत भाजपच्या प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात ( Prasad Lad in MLC election ) होणार आहे.

विधानपरिषद निवडणूक
विधानपरिषद निवडणूक

मुंबई - राज्यसभेतील पराभवानंतर आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( Vidhan Parishad Elections 2022 ) कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर रणनिती आखली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अतिरिक्त ४ मते काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पारड्यात टाकण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले ( Legislative Council Election 2022 ) आहे. या रणनीतीने शिवसेना राज्यसभेतील भाजपकडून झालेल्या दारुण पराभवाचा वचपा काढणार असल्याचे बोलले जात आहे.


भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात खरी लढत-राज्य विधानपरिषदेच्या ( Bhai Jagtap in MLC election ) १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार तर आघाडी सरकारचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. मतांचा कोटा गाठण्यासाठी छोटे पक्ष, अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र, खरी लढत भाजपच्या प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात ( Prasad Lad in MLC election ) होणार आहे.


काँग्रेसला शिवसेना देणार साथ?काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना विजयासाठी पक्षाच्या व्यतिरिक्त आठ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे त्यांच्या २ उमेदवारांसाठी लागणारी किमान मत असून ४ मत अतिरीक्त आहेत. सुरुवातीला ही मते काँग्रेसला देण्यास विरोध होता. रात्री उशिरा झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिल्लक मते जगताप यांना देण्याबाबत शिवसेनेने तयारी दर्शवल्याचे समजते. तरीही काँग्रेसच्या भाई जगताप यांना ४ मतांची आवश्यकता असणार आहे. हे मताधिक्य ते कसे गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणातमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि भाजपाचे 5 असे 11 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरशी वाढली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या ( Vidhan Parishad Elections 2022 ) निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची सूचना आल्यास अर्ज मागे घेणार असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भरलेला तिसरा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details