महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut Family Corona Positive : संजय राऊत यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण

By

Published : Jan 5, 2022, 6:38 PM IST

Updated : Jan 5, 2022, 7:35 PM IST

राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ( Maharashtra Corona Cases Increased ) बनला आहे. राज्यात आमदार, मंत्री, खासदारांना कोरोनाची लागण ( Maharashtra Minister Mla Corona Positive ) झाली आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut Family Corona Positive
संजय राऊत यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण

मुंबई :राज्यात कोरोना संसर्गित आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ ( Maharashtra Corona Cases Increased ) होत आहे. राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही कोरोनाच्या विळख्यात ( Maharashtra Minister Mla Corona Positive ) सापडले आहे. महाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना संसर्गित आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला ( Sanjay Raut Family Corona Positive ) आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने कुटुंबातील सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरगुती विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या गोवा येथे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राऊत गोव्यामध्ये ( Sanjay Raut In Goa ) बैठका घेत आहेत.

राज्यातील हे मंत्री, आमदार, खासदार कोरोना संसर्गित

कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे आदींचा समावेश आहे. तसेच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील , रोहित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज देशमुख, प्रताप सरनाईक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Last Updated :Jan 5, 2022, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details