महाराष्ट्र

maharashtra

ईडीसह सीबीआयने रामजन्म भूमीच्या खरेदी घोटाळ्याची चौकशी करावी - संजय राऊत

By

Published : Jun 25, 2021, 10:40 AM IST

केंद्र सरकारकडून या यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र आणि पंश्चिम बंगालमधील नेत्यांना त्रास दिला जात आहे. मात्र, ईडी, सीबीआय या यंत्रणांनी जर तपास करायचाच असेल तर राम जन्मभूमीच्या जमीन खरेदी संबंधी अयोध्येचे महापौर आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

रामजन्म भूमीच्या खरेदी घोटाळ्याची चौकशी
रामजन्म भूमीच्या खरेदी घोटाळ्याची चौकशी करावी - संजय राऊत

मुंबई- केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय़ या केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत का? असा खोचक टोला लगावला आहे. तसेच जर या संस्थांना तपासच करायचा असेल तर त्यांनी राम जन्मभूमी मंदिर टस्टच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.

राऊत म्हणाले, केंद्र सरकारकडून या यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र आणि पंश्चिम बंगालमधील नेत्यांना त्रास दिला जात आहे. मात्र, ईडी, सीबीआय या यंत्रणांनी जर तपास करायचाच असेल तर राम जन्मभूमीच्या जमीन खरेदी संबंधी अयोध्येचे महापौर आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीने हा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना देखील या तपास यंत्रणांचा वापर करून मानसिक त्रास दिला जात असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details