महाराष्ट्र

maharashtra

'असली आ रहा है, नकली से सावधान'; अयोध्येत शिवसेनेची बॅनरबाजी

By

Published : May 8, 2022, 8:41 AM IST

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला आयोध्याचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून देखील विरोध अधिक तीव्र केला जात आहे. तुम्ही आयोध्येला या आम्ही तुमचे व्यवस्थित स्वागत करू, अशा पद्धतीचे व्यक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग करत आहेत. त्यामुळे आता कुणाचा दौरा यशस्वी होतो व कुणाचा दौरा फ्लॉप होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अयोध्येत शिवसेनेची बॅनरबाजी
अयोध्येत शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई - महाराष्ट्रात सध्या मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. कुणाचे हिंदुत्व असली व कुणाचे हिंदुत्व नकली? कोण आयोध्येत जाणार? कोण खरा हिंदू? या सर्व वादात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मागे नाहीत. याच वादाचा पुढचा अध्याय सध्या आयोध्येत लिहिला जातोय. अयोध्येत सध्या शिवसेनेकडून बॅनरबाजी केली जात असून 'असली आ रहा है नकली से सावधान' अशा आशयाचे बॅनर लावून मनसेला डिवचण्यात आले.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा - मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जवळ येतोय. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात आयोध्येत जाणार आहेत. काकांच्या आधीच पुतण्या अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घेणार असल्याने सध्या आयोध्येत शिवसेनेकडून बॅनरबाजी सुरू आहे. त्यातच शिवसेनेने हे असली आणि नकलीचे बॅनर लावल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील संतापले आहेत. दोन तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना आपले मुद्दे पुन्हा एकदा व्यवस्थित पटवून देण्यासाठी दुसरी सभा घ्यावी लागली. मनसेने या सभेला उत्तर सभा असे नाव दिले. ही सभा ठाण्यात झाली. या सभेत राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा सांगितला व तारीख देखील जाहीर केली. राज ठाकरे यांनी दौऱ्याची 5 जून तारीख जाहीर केल्यानंतर लगेचच शिवसेनेकडून मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपण आयोजित जाणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा -पाणी टंचाईने घेतला बळी! खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

राज ठाकरेंना विरोध - दरम्यान, आता आधी ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जवळ येत आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला आयोध्याचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून देखील विरोध अधिक तीव्र केला जात आहे. तुम्ही आयोध्येला या आम्ही तुमचे व्यवस्थित स्वागत करू, अशा पद्धतीचे व्यक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग करत आहेत. त्यामुळे आता कुणाचा दौरा यशस्वी होतो व कुणाचा दौरा फ्लॉप होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details