महाराष्ट्र

maharashtra

Shiv Sena MP Bhavana Gawali : भावना गवळी यांनी ईडीकडे मागितली 15 दिवसाचा मुदत

By

Published : May 5, 2022, 7:41 PM IST

Shiv Sena MP Bhavana Gawali
भावना गवळी

शिवसेना खासदार भावना गवळी ( Shiv Sena MP Bhavana Gawali ) यांना चौकशीसाठी 5 मे रोजी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले होते. मात्र आज भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला ( Bhavana Gawali ED Enquiry ) आज पण आल्या नाही. भावना गवळी यांचे वकील इन्‍द्रपाल सिंग यांनी ईडी कार्यालयात येऊन पीडी अधिकाऱ्यांकडे चौकशीला येण्याकरिता आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असे विनंतीचे पत्र अधिकाऱ्यांना दिले ( Bhavana Gawali asked for 15 days ) आहे.

मुंबई -शिवसेना खासदार भावना गवळी( Shiv Sena MP Bhavana Gawali ) यांना चौकशीसाठी 5 मे रोजी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले होते. मात्र आज भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला ( Bhavana Gawali ED Enquiry ) आज पण आल्या नाही. भावना गवळी यांचे वकील इन्‍द्रपाल सिंग यांनी ईडी कार्यालयात येऊन पीडी अधिकाऱ्यांकडे चौकशीला येण्याकरिता आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असे विनंतीचे पत्र अधिकाऱ्यांना दिले ( Bhavana Gawali asked for 15 days ) आहे. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलेही उत्तर भावना गवळी यांच्या वकिलांना देण्यात न आल्याने येणाऱ्या काळात भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्या अजामिनपात्र वॉरंट काढण्याची मागणी ईडी न्यायालयात करू शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे.

ईडीकडून भावना गवळी यांचा 4 वेळा समन्स - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भावना गवळींना ईडीने समन्स ( ED summons to Bhavana Gawali ) पाठवले आहे. यापूर्वीसुद्धा ईडीने भावना गवळी यांना 3 वेळा समन्स पाठवला होता. भावना गवळीं यांना 5 मे रोजी उपस्थित राहणारे हे 4 समन्स होते. आज देखील भावना गवळी उपस्थित न झाल्याने येणाऱ्या काळात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने अटक केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. तसेच त्यांनी अनेकवेळा चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे जर आता चौकशीला हजर राहिल्या नाही तर ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. ईडीने भावना गवळींच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवरसुद्धा छापेमारी केली होती.

भावना गवळी यांचे वकील इन्‍द्रपाल सिंग यांची प्रतिक्रिया

भावना गवळींवर नेमके आरोप काय? - भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. याशिवाय भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अॅड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा - Kirit Somaiya : ..हिशेब तर द्यावाच लागेल.. किरीट सोमय्यांचा खासदार भावना गवळींवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details