महाराष्ट्र

maharashtra

Arvind Sawant Criticized BJP दिल्ली, पंजाबप्रमाणे भाजपा मुंबईतही भूईसपाट होणार; अरविंद सावंतांची टीका

By

Published : Sep 5, 2022, 3:23 PM IST

Updated : Sep 5, 2022, 6:08 PM IST

शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी (Arvind Sawant criticized BJP) भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा (Amit shah Mumbai visit) आणि भाजपचं मिशन मुंबई महानगरपालिका (Bjp mission mumbai Bmc) आदी मुद्द्यांवरून (Bmc Election) भाजपवर सडकून टिका केली आहे. दिल्ली, पंबाजप्रमाणे भाजपा मुंबईतही भूईसपाट होणार, अशी टीका खासदार अरविंद सावंतांनी (Arvind Sawant Criticized BJP) केली आहे.

Arvind Sawant
अरविंद सावंत

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर (Amit shah Mumbai visit) आहे. दौऱ्यात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर (shah criticized shivsena) जोरदार टीकाही केली. शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी (Arvind Sawant criticized BJP) भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा (Amit shah Mumbai visit) आणि भाजपचं मिशन मुंबई महानगरपालिका (Bjp mission mumbai Bmc) आदी मुद्द्यांवरून (Bmc Election) भाजपवर सडकून टिका केली आहे. दिल्ली, पंबाजप्रमाणे भाजपा मुंबईतही भूईसपाट होणार, अशी टीका खासदार अरविंद सावंतांनी (Arvind Sawant Criticized BJP) केली आहे.

अरविंद सावंतांची भाजपवर टीका

शिवसेनेनं मुंबईत भरीव कामं केलं- सावंतभाजपची मिशनं हि सातत्याने चालूचं असतात. याचा शिवसेनेवर विपरीत परिणाम होणार नाही. शिवसेनेन मुंबईचा पाणीप्रश्न अणि मुलभूत प्रश्नांवर मोठ्या प्रमामआथ कार्य केल आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत सेनेचं निर्वीवीद वर्चस्व पाहायला मिळेल. अस मत सावंतांनी व्यक्त केलं. अरविंद सावंत म्हणाले की भाजापाचे सगळे मिशनच असते. आज काय लोटस मिशन उद्या काय दुसरे मिशन पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात. अशी टीका त्यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजपा दूर (BJP away from people issues)आहे. मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजपा दूर आहे. मुंबई महापालिकेवर असलेला शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही हलवू शकत नाही. मुंबईतील जाती पाती सर्व धर्मीय माणसे यांना मुंबईत शांतता हवी आहे. मुंबई शहरात शिवसेनेने निर्माण केलेली व्यवस्था दिलल्या सुविधा हे मतदार विसरणार नाहीत असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना पिण्याचं पाणी 24 तास देण्याचं कामही शिवसेनेने केलं आहे. याची आठवणही त्यांनी करुन दिली

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा (Dussehra gathering is tradition of ShivSena)आहे. शिवाजी पार्क हे शिवसैनिकांसाठी शक्तीस्थळ आहे. तिथूनच शिवसैनिकांना घोषणा मिळाल्या विचार देण्यात आले. तिथूनच आंदोलन पेटली. तिथूनच देशाला दिशा देण्याचे काम करण्यात आले. तिथे झालेल्या शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा आवाज आजही शिवसैनकांच्या कानात घुमतो. म्हणून ती जागा आणि तो दिवस हा पूर्णपणे शिवसेनेचाच आहे. सीमोल्लंघन हे शिवसेनेचंच होणार असं सांगत अरविंद सावंत यांनी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात शिवसेनेचाच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने आज पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ केलेली आहे संजय राऊत यांच्याकरिता न्यायालयीन लढाई आम्ही लढू असे देखील यावेळी अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

Last Updated :Sep 5, 2022, 6:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details