महाराष्ट्र

maharashtra

Rebel MLA security issue : बंडखोर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

By

Published : Jun 25, 2022, 4:46 PM IST

राज्यात शिवसैनिकांमध्ये पसरलेला रोष ( Anger Shiv Sainiks ) पाहता बंडखोर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा ( Rebel MLA Security ) वाढवण्यात आली आहे. शिवसेना नेते बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांच्या मुंबईतील निवासस्थानी सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.

Increased security at the residence of rebel MLAs
बंडखोर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

मुंबई -बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा गटात सहभागी होऊन गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांच्या ( Rebel MLA ) मुंबईतील निवासस्थानी सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. शिवसेना बंडखोर आमदार तानाजी सावंत ( MLA Tanaji Sawant ) यांचे कार्यालय फोडण्यात आल्यानंतर तसेच मुंबईतील अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले ( Attack on MLA office ) झाल्यानंतर आता आमदारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतील सुरुची तसेच सुनीती या शासकीय इमारती बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली असून या ठिकाणी बंडखोर मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) तसेच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांची निवासस्थाने आहेत.

बंडखोर आमदार विरुद्ध शिवसैनिक -राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार विरुद्ध शिवसैनिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला ( Mumbai Police Imposed Section 144 In Mumbai ) आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड केल्यापासून ठाणे पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर स्थानिक पोलीस तसेच एसआरपीएफचा बंदोबस्त तैनात ( SRPF detachment deployed ) केला आहे. ठाण्यात काल जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू ( Curfew order applied in Thane) केले आहेत. या आदेशान्वये कोणत्याही पक्ष संघटना यांना आंदोलने निदर्शने करता येणार नाही. अशा वेळी आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी ( Supporters Eknath Shinde ) कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान,शिवसेना आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शिवनसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना कालच गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे. पुण्यात शिवसैनिकांनी राडा केला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयाची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली असून गद्दार सावंत, असे त्यांच्या कार्यालयावर लिहिले आहे. यावेळी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

क्षीरसागर यांनी शिवसेनेशी गद्दारी केली - क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाच्या नावावर ते मोठे झाले आहेत. पक्षाने मंत्रीपद दिले, कार्यालय, वैभव दिले. इतके सर्व देऊनही त्यांची भूक मिटलेली नाही. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा अहंकार जिरवू, पक्षाच्या नावावर मोठे झालेल्यांना धडा शिकवू, असेही शिवसैनिक म्हटले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर कोल्हापूर होते. मातोश्री आपले मंदिर आहे, उद्धव ठाकरे दैवत आहे म्हणत होते. मात्र, त्याच रात्री ते शिंदे यांना जाऊन मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा -Shivsena National Executive Meeting : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून मान्यता

हेही वाचा -पूरस्थितीचे कारण सांगून पाहुण्यांना आम्ही बाहेर काढू का, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details