महाराष्ट्र

maharashtra

Mumbai CP Pandey : नुपूर शर्मा यांना लवकरच समन्स; सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू - संजय पांडे

By

Published : Jun 6, 2022, 7:53 PM IST

Updated : Jun 6, 2022, 8:01 PM IST

कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना समन्स ( mumbai police on nupur sharma ) पाठवणार आहेत. याबाबत जबानी नोंद घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त म्हणजे संजय पांडे यांनी ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) दिली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ( Sanjay Pandey on Salman Khan threat case )

Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे

मुंबई -ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेदरम्यान प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मायांना समन्स पाठवणार आहेत. याबाबत जबानी नोंद घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी ( Sanjay Pandey on Salman Khan threat case ) सांगितले.

संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त

भाजपने शर्मायांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर आता मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. शर्माया भाजपच्या प्रवक्त्या होत्या. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मोठा वाद निर्माण झाला असून जगभरातील अनेक मुस्लिमबहुल देशांचा याचा निषेध केला आहे. त्यानंतर भाजपने शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले.

सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू -अभिनेता सलमान खानला आलेल्या धमकीचा विषय जेवढा गंभीर आहे, तेवढ्याच गांभीर्याने पोलीस तपास करत आहेत. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. गरज पडली तर आम्ही पोलीस सुरक्षा वाढवू. धमकीच्या पत्रात जो मजकूर आहे. त्यावर पोलीस तपास सुरू आहे असा खुलासा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केला आहे.

सखोल चौकशी सुरू - गेल्या आठवड्यात पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पंजाबमध्ये तणाव वाढला आहे. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी आल्याने महाराष्ट्र सरकारकडून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जे पत्र सलमान आणि त्याच्या वडिलांच्या नावाने आलेले आहे. त्याची पडताळणी सुरु आहे. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत. जो तपास होणे आवश्यक आहे त्यानुसार तपास सुरु आहे. सलमान खानची सिक्युरिटी वाढवणे ही आमची अंतर्गत गोष्ट आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. हे पत्र कुठून आले त्यावर आताच बोलण निष्कर्ष काढणे आताच योग्य ठरणार नाही. तर दुसरीकडे पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचीही पोलिसांनी धमकीच्या पत्राबाबत चौकशी केली आहे.

200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात - अभिनेता सलमान खान आलेल्या धमकीच्या पत्राचा तपास करण्याकरिता मुंबई पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची एकूण 10 पथके या प्रकरणाच्या तपासात करत असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा -Warrant against Raj Thackeray : राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाचे वॉरंट; 8 जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश

Last Updated :Jun 6, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details