महाराष्ट्र

maharashtra

Railway Ministry Advises Wear Mask : प्रवाशांनो लक्ष द्या; रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक

By

Published : May 11, 2022, 7:15 PM IST

Railway Ministry Advises Wear Mask

देशभरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला ( Covid Cases Rises ) आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले ( Railway Ministry Advises Wear Mask ) आहे.

मुंबई - देशभरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला ( Covid Cases Rises ) आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले ( Railway Ministry Advises Wear Mask ) आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशातील सर्व रेल्वे झोनल कार्यालयांना दिले आहे.

सर्व झोन कार्यालयांना पत्र - गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार २०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. दुसरीकडे रेल्वेने खबरदारी म्हणून 22 मार्च रोजी कोविड संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशभरातील सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना दिले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने पत्र सुद्धा पाठवले आहे. याशिवाय रेल्वे बोर्डाने सर्व झोनल रेल्वे विभागांना सुचना दिल्या आहे की, सर्व रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क वापरने बंधनकारक केले आहे. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मास्कचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे.

कोविड नियमांचे पालन करण्यास सुरुवात - देशात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेने प्रवासादरम्यान मास्कची अट रद्द केली होती. तेव्हापासून रेल्वेमध्ये पूर्वीप्रमाणेच पॅन्ट्री आणि बेडिंगही सुविधाही सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता देशात कोरोनाचा वाढता वेग पाहता रेल्वे मंत्रालयाने पुन्हा कोविड नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

प्रवाशांवर कारवाई होणार -यापूर्वी मध्य रेल्वेने विनामास्क प्रवाशांवर कारवाई केली आहे. १७ एप्रिल २०२१ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान मास्क न घातलेल्या ३४ हजार ७२४ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई होती. त्यांच्याकडून ५७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेकडून विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा तयारीत आहे. लवकरच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे याबाबद्दल नियमावली जाहीर करणार आहे.

हेही वाचा -Congress Vs Bjp : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात भाजपची उडी; दरेकर म्हणाले, 'पाठीत खंजीर खुपसला सांगण्यापेक्षा...'

ABOUT THE AUTHOR

...view details