महाराष्ट्र

maharashtra

मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मागितली ३० लाखांची खंडणी

By

Published : Nov 17, 2021, 3:36 PM IST

Updated : Nov 17, 2021, 3:47 PM IST

साताऱ्यातील कंदी पेढ्याचे (kandi pedha satara) प्रसिद्ध व्यापारी प्रशांत मोदी (Prashant Modi) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यांना 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात (demanded 30 lakh ransom) आली आहे.

kandi pedha satara
मोदी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मागितली ३० लाखांची खंडणी

सातारा - साताऱ्यातील कंदी पेढ्याचे (kandi pedha satara) प्रसिद्ध व्यापारी प्रशांत मोदी (Prashant Modi) यांना ३० लाख रुपयांची खंडणी (demanded 30 lakh ransom) उकळण्यासाठी काही धमकीवजा फोन येत आहेत. हे काॅल इंटरनॅशनल असून खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात व्यापाऱ्याने सायबर क्राईमकडे (Cyber Crime) धाव घेतली आहे.

आठ दिवसांपासून धमकावणी -

प्रशांत मोदी असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलये की, मोदी यांना गेल्या आठ दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत आहेत. ३० लाख रुपये दे अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र रात्री-अपरात्री देखील फोन तसेच मेसेज येऊ लागले. वारंवार तीस लाख रुपये देण्यासाठी धमकावले आहे. असे सुमारे १० ते १२ कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ई मेल करून तक्रार पाठवली आहे. फोन नंबर, मेसेजचे स्क्रीन शॉटदेखील जोडण्यात आले आहेत. खंडणीखोराने मोदी यांना केलेल्या एसएमएसमध्ये दोन मोबाईल क्रमांकांचा उल्लेख आहे. त्यात 'prks nimbkar ISI PAK' असे म्हटले आहे.

'धमकी कसली देतो कान हानीन'-

साताऱ्यात बऱ्याच जणांना आंतरराष्टूीय काॅल येतात. मात्र अशा पद्धतीने धमकावण्याचा प्रकार दिर्घ कालावधीनंतर प्रथमच घडत असल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात प्रशांत मोदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भितीचे कारण नाही. पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती असावी. जेणेकरुन भविष्यात असले प्रकार थांबतील. म्हणून तक्रार केली आहे. धमक्यांना घाबरण्यासारखे काही नाही. उलट मी तर एका काॅलला उत्तर देताना 'धमकी कसली देतो कान हानीन' असे बजावल्याचे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा -500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल

Last Updated : Nov 17, 2021, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details