महाराष्ट्र

maharashtra

Eknath Shinde : विधानसभा उपाध्यक्षांकडून १६ बंडखोर आमदारांना नोटीस

By

Published : Jun 25, 2022, 6:33 PM IST

Updated : Jun 25, 2022, 7:50 PM IST

महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना येत्या ४८ उत्तर देण्याचे सांगितले आहे.

Eknath Shinde
नरहरी झिरवाळ

मुंबई -महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना येत्या ४८ उत्तर देण्याचे सांगितले आहे.

'या' आमदारांना नोटीस -एकनाथ शिंदे, अनिल बाबर,लता सोनावणे, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारेयामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, या आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नोटीस पाठवणार आहेत.

विधानसभा उपाध्यक्षांकडून १६ बंडखोर आमदारांना नोटीस

सदस्यत्व रद्द होणार - शिवसेनेचे बंडखोर आमदारांपैकी 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षाकडून विधिमंडळ आकडे करण्यात आली होती. ती मागणी मान्य करत 16 आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ज्या 16 आमदारांना आता 48 तासांत आपली भूमिका मांडावी लागणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिवसेनेकडून आमदारांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधानसभा उपाध्यक्ष यांनी ही नोटीस बजावली आहे. सोमवारी 27 जूनच्या सायंकाळ पर्यंत या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सोमवार पर्यंत बंडखोर आमदारांनी आपली बाजू मांडली नाही तर त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत या नोटीस विरोधात न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव असल्याने ते असा निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्नही बंडखोर आमदाराच्या गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

  1. हेही वाचा -Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ
Last Updated :Jun 25, 2022, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details