महाराष्ट्र

maharashtra

Nitin Raut : राज्यात भारनियमन नाही; कोळसा टंचाई सुरूच - नितीन राऊत

By

Published : Apr 29, 2022, 3:34 PM IST

राज्यातील भारनियमन बंद करण्यात आले ( No Load Shedding ) आहे. तर, कोळसा टंचाई ( Coal Shortage In Maharashtra ) मात्र अजूनही जाणवत असल्याचे नितीन राऊतांनी ( Minister Nitin Raut ) सांगितले आहे.

Nitin Raut
Nitin Raut

मुंबई - देशभरात कोळसा टंचाईमुळे निर्माण झालेले वीज संकट अजूनही पुरते टळलेले नाही. मात्र, राज्यातील भारनियमन बंद करण्यात आले ( No Load Shedding ) आहे. त्यामुळे अखंडीत वीज पुरवठा होत असल्याचा दावा ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी केला आहे. तर, कोळसा टंचाई ( Coal Shortage In Maharashtra ) मात्र अजूनही जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितीन राऊत म्हणाले, देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र कोळसा टंचाई जाणवत असल्याने राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागले. बाराशे मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत असल्याने राज्यभरात चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले. पण, आता राज्यातील भारनियमन पूर्णतः बंद झाले असून, महावितरणच्या प्रभावी नियोजन आणि उपाययोजनांमुळे कुठेही भारनियमन होत नाही, असेही राऊतांनी सांगितले.

विजेच्या मागणी इतकाच पुरवठा -राज्यात गुरुवारी दुपारी चोवीस हजार सात मेगा वॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस प्रकल्पांतून ७६७९ मेगावॅट, केंद्राकडून ५४३४ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून १४३० मेगावॅट, अदानीकडून २९८३ मेगावॅट, रतन इंडियाकडून १२०० मेगावॅट, बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १४०२ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १०९२ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून ४६० मेगावॅट, एम्को १९४ मेगावॅट, सीजीपीएल ७३५ मेगावॅट, साई वर्धा १५१ मेगावॅट, सहवीज निर्मितीतून ९०५, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून ३४२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता आला, असा दावा महावितरणने केला आहे. याच प्रमाणे आगामी काळातही नियोजन आणि प्रभावी उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

काही ठिकाणी दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा -राज्यातील वीज टंचाईचे संकट अध्याप टळलेले नाही. वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे काही वीजनिर्मिती केंद्रांवर तर केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कोळशाची उपलब्धता? - सध्या राज्यात असलेल्या कोळशाची उपलब्धता वीज निर्मिती केंद्र निहाय पुढील प्रमाणे, कोराडी येथे २७ हजार ७३५ टन, इतका वॉश कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे गुरुवारी येथे केवळ दीड दिवस पुरेल इतका कोळसा उपलब्ध आहे. कोराडी येथील २१० मेगावॅटच्या प्लांटमध्ये ६५७५ टन इतका कोळसा शिल्लक असून, हा दोन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. नाशिक येथे पंधरा हजार ३७२ टन इतका कोळसा असून, हा दीड दिवस पुरेल इतका कोळसा आहे. भुसावळ येथे २९ हजार टन इतका कोळसा शिल्लक असून, हा दीड दिवस पुरेल. परळी येथे ६७ हजार १७३ टन इतका कोळसा असून, हा साडे पाच दिवस पुरेल इतका आहे. पारस येथे १५ हजार टन इतका कोळसा असून, हा जेमतेम दोन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. १७७५ टन इतका कोळसा असून, हा साडे सहा दिवस पुरेल इतका कोळसा आहे. तर, खापरखेडा येथे १ लाख २२ हजार ३८७ टन इतका कोळसा असून, तो सहा दिवस पुरेल इतका आहे.

किती कच्चा आणि किती वॉश कोळसा? - राज्यात दररोज सुमारे एक लाख ४२ हजार टन इतका कोळसा वीज निर्मितीसाठी आवश्यक असतो. यापैकी कच्चा कोळसा सुमारे एक लाख तर वॉश कोळसा ४४ हजार २९८ टन प्राप्त झाला आहे. एकूण कोळशाची उपलब्धता ही पाच लाख ९३ हजार ६७८ इतकी आजमितीला आहे. महावितरण मी कसेतरी उपाययोजना करून सध्या भारनियमन नियंत्रणात आणले आहे. मात्र, केंद्र सरकारने कोळसा पुरवठा वेळेत करणे गरजेचे आहे. जर, वेळेत कोळसा मिळाला नाही. तर, पुन्हा संकट उद्भवू शकते, असेही नितीन राऊत म्हणाले आहे.

हेही वाचा -Mumbai AC Local Train : रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा; एसी लोकलचे 50 टक्के भाडे कमी

ABOUT THE AUTHOR

...view details