महाराष्ट्र

maharashtra

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे

By

Published : Mar 20, 2021, 2:15 PM IST

Updated : Mar 20, 2021, 5:31 PM IST

NIA will investigate mansukh hiren death case
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे

14:08 March 20

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे

मुंबई- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. तपास एनआयएकडे सोपवल्याने सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँटिलिया कारमध्ये स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून आता या प्रकरणाचा तपासदेखील एनआयए करणार आहे.  

काय आहे प्रकरण - 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आढळून आली होती. याप्रकरणाचा तपास एटीएस करत होते. मात्र केंद्राच्या एनआयएनेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसमार्फत चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून बाजूला केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आणि हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय बळावला. वाझेंची चौकशी झाल्यानंतर त्यांना अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी आधीच एनआयए कोठडीत असलेल्या वाझेंच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करणार असून हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय आहे. 

Last Updated :Mar 20, 2021, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details