महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update चाचण्या घटल्याने रुग्णसंख्याही घटली, मुंबईत मंगळवारी ३३२ नवे रुग्ण

By

Published : Aug 16, 2022, 9:13 PM IST

मुंबईत रोज ७ ते ९ हजार चाचण्या केल्या जातात. गेल्या २४ तासात ३,४९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३२ नवे रुग्ण Mumbai Corona Update आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे.

Mumbai Corona
फाईल फोटो

मुंबई मुंबईत १० ऑगस्ट ते १४ ऑगस्टला रोज ८०० हुन अधिक रुग्णांची नोंद होत होती. काल १५ ऑगस्टला त्यात घट होऊन ५८४ रुग्णांची नोंद झाली. आज चाचण्या कमी केल्याने ३३२ रुग्णांची नोंद झाली Mumbai Corona Update आहे. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४०९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

३३२ नवे रुग्णमुंबईत रोज ७ ते ९ हजार चाचण्या केल्या जातात. गेल्या २४ तासात ३,४९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३३ हजार ५०४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ८ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,०७१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०६६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६४ टक्के इतका आहे.


रुग्णसंख्येत चढ उतारमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२ रुग्णांची नोंद झाली आहे.


११७ वेळा शून्य मृत्यूची नोंदमुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details