महाराष्ट्र

maharashtra

शहाण्याला शब्दाचा मार.. पत्र गेलं आहे मात्र वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल, पवारांचा राज्यपालांना टोला

By

Published : Aug 16, 2021, 7:07 PM IST

Updated : Aug 16, 2021, 9:49 PM IST

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राज्यपालांचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला हाणला आहे.

sharad-pawar-criticism-of-governor
sharad-pawar-criticism-of-governor

मुंबई -राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशित सदस्यांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला.. म्हणत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत टोला लगावला आहे. मुंबईत शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा टोला राज्यपालांना लगावला.

12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्य यांच्या नियुक्तीबाबत आठ महिन्यानंतरही प्रलंबित आहे. सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त राज्यपाल पुण्यामध्ये होते. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी कार्यक्रमादरम्यान राज्यपालांना प्रलंबित 12 आमदारांच्या मुद्द्याबाबत छेडले असता 'राज्य सरकार काही विचारत नाही, मग तुम्ही का विचारता' असा उलट प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद रणपिसे यांना केला होता. याबाबत सांगताना शरद पवार म्हणाले की, प्रलंबित 12 आमदारांच्या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना या प्रश्नाबाबत पत्र लिहिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील याबाबत राजभवनवर जाऊन राज्यपालांना पत्र दिले होते. मात्र तरीही राज्यपाल असे बोलत आहेत. त्यामुळे शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला.. असे म्हणत शरद पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. त्यासोबतच राज्यपालांच्या वाढत्या वयामुळे त्यांना पत्र वाचता आलं नसावे, असा चिमटाही शरद पवार यांनी काढला.

पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचावी -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं असल्याचे वक्तव्य एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर, राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचल्यास त्यांना याचे उत्तर मिळेल असे म्हणत शरद पवारांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
अमित शाहांनी पुण्याला येण्याचे निमंत्रण स्वीकारले -
दिल्लीमध्ये असताना सहकार क्षेत्रातील प्रश्नांबाबत सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान काही नेतेही शरद पवार यांच्यासोबत होते. यावेळी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासंदर्भात निमंत्रण शरद पवार यांनी अमित शहा यांना दिले होते. हे आमंत्रण अमित शाह यांनी स्वीकारले असून लवकरच ते पुण्याला भेट देणार असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
शेजारी देशात सोबत संबंध पडताळण्याची गरज -
अफगाणिस्तानातील सध्या परिस्थिती खूप बिकट आहे. तालिबान संघटनेने संपूर्ण नियंत्रण या देशावर मिळवले असून, आम्हाला शांतता हवी आहे असे आता तालिबानी म्हणत आहेत. मात्र तसे होणार नाही असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. याआधी भारताशेजारील असलेले पाकिस्तान आणि चीन या दोन देशामुळे भारतासमोर अडचणी निर्माण होत होत्या. आता त्यात अफगाणिस्तानची देखील भर पडली असून, भारताशेजारील असलेल्या सर्व देशांशी संबंध पडताळण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
Last Updated : Aug 16, 2021, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details