महाराष्ट्र

maharashtra

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी घेतले मुंबईच्या ग्रामदेवतेचे दर्शन, संरक्षणासाठी केली प्रार्थना

By

Published : Sep 28, 2022, 11:10 AM IST

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल रात्री मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवीचे दर्शन घेतले आणि आदिशक्तीकडे मुंबईच्या संरक्षणाची व सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली. आदित्य ठाकरे यांनी मुंबादेवी दर्शनातून मुंबई महापालिका निवडणूकीच्या तयारीचा बिगूल फुंकला असे म्हटले जात आहे.

Aaditya Thackeray Mumbadevi Darshan
आदित्य ठाकरे

मुंबई: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल रात्री मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवीचे दर्शन घेतले आणि आदिशक्तीकडे मुंबईच्या संरक्षणाची व सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली. खरी शिवसेना कोणाची याबद्दलचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत निर्णय देताना निवडणूक आयोगाला आपली प्रक्रिया सुरू ठेवावी असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय उध्दव ठाकरे यांच्यासाठी झटका मानला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतात अशी शक्यता भाजपाच्या चिंतन शिबिरामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुंबादेवी दर्शनातून मुंबई महापालिका निवडणूकीच्या तयारीचा बिगूल फुंकला असे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details