महाराष्ट्र

maharashtra

NCW Written Letter Maharashtra DGP 'त्या' महिलेला मारहाण करणाऱ्याला तत्काळ अटक करा; महिला आयोगाचे महाराष्ट्र डीजीपींना पत्र

By

Published : Sep 2, 2022, 3:40 PM IST

Updated : Sep 2, 2022, 3:56 PM IST

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र डीजीपींना NCW Written Letter Maharashtra DGP पत्र लिहिले आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली आहे. शिवाय या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणीही केली आहे. सोबतच केलेल्या कारवाईची पाच दिवसांत माहिती द्यावी, असेही आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

Etv Bh महिला आयोगाचे महाराष्ट्र डीजीपींना पत्रarat
Etv Bhar महिला आयोगाचे महाराष्ट्र डीजीपींना पत्रat

मुंबई - मुंबईतील कामाठीपुरा 28 सप्टेंबरला पुरुषाने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आता प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र डीजीपींना NCW Written Letter Maharashtra DGP पत्र लिहिले आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली आहे. शिवाय या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणीही केली आहे. सोबतच केलेल्या कारवाईची पाच दिवसांत माहिती द्यावी, असेही आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांच्या स्वागताचा बॅनर लावण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या Maharashtra Navnirman Sena पदाधिकाऱ्याने एका महिलेस मारहाण MNS worker beat woman In mumbai केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनोद आग्रिले Vinod Agrile असं मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं असून ते मनसेचे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष आहेत.

मनसे महिलेला मारहाण - कामाठीपुरा येथील गल्ली नंबर 8 मध्ये ही घटना 28 ऑगस्ट रविवार घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हीडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणात नागपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. मुंबईत राज ठाकरेंच्या Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला धक्काबुक्की तसेच चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरोपी व्यक्तीचे नाव विनोद अरगिले असून तो मनसे कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

मनसे कार्यकर्त्याची मारहाण

नेमके काय घडले -मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबा देवी परिसरात राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बांबूचे खांब उभारत होते, मात्र प्रकाश देवी यांनी त्यांना त्यांच्या औषधाच्या दुकानासमोर खांब लावण्यास सांगितले. त्यानंतर केवळ आपल्याला मारहाणच झाली नाही तर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळही केल्याचे त्यांनी सांगितले. 80 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पुरुष पीडित महिलेला ओढताना दिसत आहेत. मात्र ती सतत मारहाण, थापड, धक्काबुक्की याला विरोध करताना दिसत आहे. अखेरीस ती रस्त्यावर पडते. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोक हस्तक्षेप करत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या तीन दिवसांनंतर 31 ऑगस्ट रोजी महिलेने तक्रार दाखल केली. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचाMNS Worker Beat Woman In Mumbai राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची दादागिरी, महिलेसोबत केले असे कृत्य

Last Updated : Sep 2, 2022, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details