ETV Bharat / city

MNS Worker Beat Woman In Mumbai राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची दादागिरी, महिलेसोबत केले असे कृत्य

author img

By

Published : Sep 2, 2022, 10:52 AM IST

Updated : Sep 2, 2022, 1:11 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या Maharashtra Navnirman Sena पदाधिकाऱ्याने एका महिलेस मारहाण MNS worker beat woman In mumbai केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनोद आग्रिले Vinod Agrile असं मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे.

MNS Worker Beat Woman In Mumbai
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची दादागिरी

मुंबई - गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांच्या स्वागताचा बॅनर लावण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या Maharashtra Navnirman Sena पदाधिकाऱ्याने एका महिलेस मारहाण MNS worker beat woman In mumbai केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनोद आग्रिले Vinod Agrile असं मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं असून ते मनसेचे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष आहेत.

मुंबईत मनसे कार्यकर्त्याची महिलेला मारहाण

मनसे महिलेला मारहाण - कामाठीपुरा येथील गल्ली नंबर 8 मध्ये ही घटना 28 ऑगस्ट रविवार घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हीडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणात नागपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. मुंबईत राज ठाकरेंच्या Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला धक्काबुक्की तसेच चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरोपी व्यक्तीचे नाव विनोद अरगिले असून तो मनसे कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

पोलीस उपायुक्ताची प्रतिक्रिया

वास्तविक हे संपूर्ण प्रकरण 28 ऑगस्टचे आहे जेव्हा विनोद अरगिले यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार फलक लावण्यासाठी परिसरात खांब लावले. खांब लावल्याबद्दल पीडित महिलेने आक्षेप घेतला. त्यातून वादावादी झाली ज्याच रूपांतरण मारहाणीत झाले. मुंबईतील नागपाडा पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. नागपाडा पोलिसांनी मनसे कार्यकर्ता विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आयपीसी फौजदारी कलम 7 च्या कलम 323,337,506 504,509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.




नेमके काय घडले - मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबा देवी परिसरात राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बांबूचे खांब उभारत होते, मात्र प्रकाश देवी यांनी त्यांना त्यांच्या औषधाच्या दुकानासमोर खांब लावण्यास सांगितले. त्यानंतर केवळ आपल्याला मारहाणच झाली नाही तर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळही केल्याचे त्यांनी सांगितले. 80 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पुरुष पीडित महिलेला ओढताना दिसत आहेत. मात्र ती सतत मारहाण, थापड, धक्काबुक्की याला विरोध करताना दिसत आहे. अखेरीस ती रस्त्यावर पडते. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोक हस्तक्षेप करत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या तीन दिवसांनंतर 31 ऑगस्ट रोजी महिलेने तक्रार दाखल केली. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


हेही वाचा - Ajit Pawar on Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवारांचे भाष्य

Last Updated :Sep 2, 2022, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.