महाराष्ट्र

maharashtra

Bail Granted To Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर

By

Published : Apr 22, 2022, 6:52 PM IST

शरद पवारांचे ( NCP Chief Sharad Pawar ) निवासस्थान सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी ( Silver Oak Attack Case ) वकील गुणरत्न सदावर्ते ( Bail Granted To Gunratna Sadavarte ) यांच्यासह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर ( 115 ST Workers Bail Granted ) करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) हा जामीन दिला आहे.

Gunratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते

मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) वकील गुणरत्न सदावर्ते ( Bail Granted To Gunratna Sadavarte ) यांच्यासह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना ( 115 ST Workers Bail Granted ) मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) जामीन मंजूर केला आहे. अपर सत्र न्यायधीस आर एम सादराणी यांनी हा निर्णय दिला. सदावर्ते यांना 50 हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार अनिवार्य तर 115 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

८ एप्रिल रोजी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर कट रचल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details