महाराष्ट्र

maharashtra

सचिन वाझे यांची 'ही' मागणी विशेष एनआयए न्यायालयाने नाकारली

By

Published : Apr 29, 2021, 8:22 AM IST

सचिन वाझे आधीपासूनच पाठीच्या दुखण्यापासून ग्रस्त आहे, यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणि झोपायला मॅट देण्यात यावा, ही मागणी करण्यात आली होती.

सचिन वाझे यांची 'ही' मागणी
सचिन वाझे यांची 'ही' मागणी


मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे माजी अधिकारी सचिन वाझे हे सध्या एनआयएच्या कस्टडीत आहेत. मात्र सचिन वाझेला पाठदुखीचा त्रास आहे, त्या संदर्भात करण्यात आलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सचिन वाझेंच्या वकिलाने बुधवारी कोर्टात सांगितले की, सचिन वाझे आधीपासूनच पाठीच्या दुखण्यापासून ग्रस्त आहे, यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणि झोपायला मॅट देण्यात यावा. मात्र यावर ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले आहे की, जेजे रुग्णालयाच्या अहवालानुसार सचिन वाझे सामान्य आहेत, या कारणास्तव आम्ही परवानगी देऊ शकत नाही. वाझे यांचे वकील म्हणाले की, वाझे यांना दातांची समस्या आहे, त्यावर तरुंगातील रुग्णालयात उपचार घेण्यात यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे.

सुनील माने यांच्या कोठडीत वाढ

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सुनील मानेची एनआयए कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली.

एनआयएने बुधवारी इन्स्पेक्टर सुनील माने यांना न्यायालयात हजर केले असता, एनआयएने सांगितले की सुनील माने 4 मार्च रोजी संध्याकाळी आपल्या कार्यालयात नव्हते, तर मनसुखची हत्या झाली तेव्हा ठाण्यात गेले होते.


एनआयएच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की 4 मार्च रोजी सुनील माने यांनी आपला मोबाइल बंद केला आणि तो आपल्या बॅगमध्ये ठेवला होता. तसेच ती बॅग त्याच्या कार्यालयात म्हणजे कांदिवलीच्या गुन्हे शाखेत ठेवली होती. यानंतर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्यास ती बॅग आपल्या घरी घेऊन जाण्यास सांगितले होते.

मनसुखचा मोबाईल सुनील माने यांच्याकडे

माने पुन्हा कळवा येथे गेले असता, सचिन वाझे यांनी मानेला त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर दोघे जण मुंब्राकडे निघाले आणि जाताना मनसुखलाही त्यांच्या गाडीत घेऊन गेले. मनसुखचा मोबाईल सुनील माने यांनी ताब्यात घेतला होता आणि त्याने तो ताबडतोब बंद केला, जेणेकरुन त्याला कोठे नेले जात आहे, हे कळले नसते. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी माने यांची 1 मे पर्यंत कोठडी वाढवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details