महाराष्ट्र

maharashtra

Reaction on BMC Election : मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाकडून शिंदे गटाचा वापर

By

Published : Jul 2, 2022, 5:48 PM IST

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर भाजपने त्यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) केले. यामागे भाजपचा मोठा डाव असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आता जे बंडखोर आमदार त्यांच्याकडे गेले आहेत त्यांचा वापर मुंबई महापालिका ताब्यात घेण्याकरिता ( To take Possession of BMC ) ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले

Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिका

मुंबई :शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाकडून एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतअसलेल्या आमदारांचा वापर करून घेतला जाणार आहे.

मुंबई महापालिकेवर प्रतिक्रिया

पालिकेवर शिवसेनेची सत्ता :देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. या मुंबईमधील नागरिकांना मुंबई महानगर पालिकेकडून सोयीसुविधा पुरवल्या जातात. मुंबई महानगरपालिकेचा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. अशा महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या कालावधीत काही गेली ५ वर्षे सोडल्यास भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक आहेत. त्यावेळेची शिवसेनेने महापौर पद मिळवले. मात्र आपले महापौर पद शाबूत राहावे म्हणून शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडावे लागले. अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेने प्रवेश देऊन आपल्या नगरसेवकांची संख्या ९७ पर्यंत नेली.

शिंदे गटाचा असा केला जाणार वापर :२०१७ च्या निवडणुकीतील निकाल पाहता भाजपाला शिवसेनेपेक्षा दोनच जागा कमी मिळाल्या होत्या. पालिकेत एकूण २३६ जागा असून त्यापैकी ५० टक्के जागा म्हणजेच ११८ जागा निवडून आणण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असलेले मुंबईमधील आमदार प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचा वापर केला जाणार आहे. या आमदारांच्या सोबत असलेल्या २० ते २२ नगरसेकांना भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून लढवून ११८ हुन अधिक नगरसेवक जिंकून आणून भाजपचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवण्याची रणनीती बनवण्यात आली आहे.


भाजपचे 'मिशन १३४' :मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी पालिकेने 'मिशन १३४' सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिकेला यंदा १३४ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे १३४ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे अशी माहिती आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेत मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल असा विश्वास भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. भाजपाने आधीच 'मिशन १३४' सुरु केले आहे. त्यानुसार भाजपचे काम सुरु आहे अशी माहिती भाजपचे पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.

महाराष्ट्र कोणाच्या चरणी : मुंबई महापालिकेतील नगरसेवक फुटणार अशी चर्चा आहे. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आताच जर आणि तर वर बोलणे योग्य होणार नाही. सर्वच गोष्टींना काळ हाच एक औषध असते. उद्धव ठाकरे यांनी जे काम केले आहे ते देशभरात, जगभरात सर्वानी पाहिले आहे. स्फटिकासारखे स्वच्छ विचार आणि हृदय असणारा मुख्यमंत्री आज मिळाले आहेत. भाजपा सोडून सर्व पक्ष आपण चांगला मुख्यमंत्री गमावतो आहे हे बोलत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स द्वारे भीतीचे वातावरण निर्माण होऊन जे लोक गेले आहेत याचा जनता विचार करत आहे. हे लोक महाराष्ट्र कोणाच्या चरणी विलीन करत आहेत हे दिसत आहे असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेची महापालिका शाबीत राहील :त्यांनी केलेल्या गोष्टी आता प्रत्यक्षात दिसू लागल्या आहेत. त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आमचाही कॉन्फिडन्स कमी झालेला नाही. येणाऱ्या काळात शिवसेनेची महापालिका शाबीत राहील. ज्यांनी महापालिका धुतली असे जे म्हणतात होते ते आज तिकडे गेले आहेत असे यशवंत जाधव यांचे नाव न घेता टोला लगावला. वॉशिंग मशीन तयार आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याची तयारी आहे. मात्र हे जनता विसरणार नाही असे पेडणेकर म्हणाल्या.

महापालिकेत होते शिवसेनेचे ९७ नगरसेवक :मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची गेले २५ वर्षाहून अधिककाळ सत्ता आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. महापौरपद भाजपाकडे जाऊ नये म्हणून शिवसेनेने मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले. तसेच अपक्ष नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामुळे शिवसेनेचे ९७ नगरसेवक होते. ७ मार्च २०२२ रोजी पालिकेचा कार्यकाळ संपला असल्याने पालिकेवर आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. शिवसेनेचे ९७ पैकी २० ते २२ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गट, भाजपा या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

हेही वाचा :Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचे लक्ष बंडखोरांकडे वळवून भाजपाची पालिका निवडणूक तयारी!

ABOUT THE AUTHOR

...view details