महाराष्ट्र

maharashtra

Mumbai High Court : गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

By

Published : Apr 12, 2022, 8:24 PM IST

भाजपा नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. यावर न्यायालयाने निर्देश दिले आहे.

गिरीश महाजन
गिरीश महाजन

मुंबई -जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून ट्रस्टींना धमकावल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या भाजपा नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन वर्षापूर्वीच्या फौजदारी गुन्ह्यात 25 एप्रिलपर्यंत महाजन यांच्यासह अन्य दोघांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे आदेश आज (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने विशेष सरकारी वकील कधी नियुक्त करणार? त्याबाबत माहिती देण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहे. पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे.


सुनावणीदरम्यान गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले, की सरकारी वकील प्रविण चव्हाण प्रकरणातील व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्या नावाचा उल्लेख हे षडयंत्र असल्याचा महाजनांचा उच्च न्यायालयात दावा केला असून त्याच अनुषंगाने या प्रकरणात आम्हाला अडकवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात गिरीश महाजनांसह अन्य आरोपींकडून तपास पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.



कोथरूड पोलीस ठाण्यात गिरीष महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात धमकाविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात दोघांनी यापरकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर डिसेंबरमध्ये 2020 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या कथित घटनेवर ही तक्रार केली आहे. त्यामुळे ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. असा दावा महाजन यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालय मागील सुनावणीदरम्यान करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण ? :जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण 29 जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा -Highest Retail inflation : किरकोळ बाजारपेठेत महागाईचा 17 महिन्यांतील कळस; मार्चमध्ये महागाईचे प्रमाण 6.95 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details