महाराष्ट्र

maharashtra

जगण्याची अशीही जिद्द; दिव्यांग विक्रेत्याकडून मुंबईतील रस्त्यांवर दिवाळीतील कंदीलांची विक्री

By

Published : Oct 18, 2021, 9:10 PM IST

मशिनचा धक्का बसल्याने अकीलन यांनी 1980 मध्ये हात गमाविला. अकील यांचे प्राण वाचले. मात्र, त्यांनी हात कायमचा गमाविला. संकट आले तरी त्यांनी कष्ट करणे सुरुच ठेवले. एक हात नसतानाही त्यांनी जिद्दीने त्याची कमतरता जाणू दिली नाही.

मुंबईतील रस्त्यांवर दिवाळीतील कंदीलांची विक्री
मुंबईतील रस्त्यांवर दिवाळीतील कंदीलांची विक्री

मुंबई-दिवाळीकडे प्रकाशाचा सण म्हणून पाहिले जाते. पण, दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना आयुष्यात निराशारुपी अंधकाराला सामोरे जावे लागते. तरीही अनेक दिव्यांग परिस्थितीवर मात करत चांगले उदाहण घालून देतात. मुंबईमधील दादर मार्केटमध्ये कंदील विकणारे मोहम्मद अकील असेच विक्रेते आहेत. ते पारंपरिक कंदील रस्त्यावर विकतात.

मोहम्मद अकील सांगतात, एक हात नाही. पण, दोन हात असलेल्या व्यक्तींहून मी कमी नाही. अकील हे घाऊक दराने अकोल्यावरून आकाशकंदील विकत घेतात. हे आकाशकंदील ते मुंबईमधील बाजार आणि रस्त्यांवर विकून चरितार्थ चालवितात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असे कुटुंब आहे.

दिव्यांग विक्रेत्याकडून मुंबईतील रस्त्यांवर दिवाळीतील कंदीलांची विक्री

हेही वाचा-Maharashtra Unlock : यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार

मशिनचा धक्का बसल्याने अकीलन यांनी 1980 मध्ये हात गमाविला. अकील यांचे प्राण वाचले. मात्र, त्यांनी हात कायमचा गमाविला. संकट आले तरी त्यांनी कष्ट करणे सुरुच ठेवले. एक हात नसतानाही त्यांनी जिद्दीने त्याची कमतरता जाणू दिली नाही. अकील सांगतात, की हात नसल्याने अनेकजण कंदील खरेदी करतात. पोट भरण्यासाठी कष्ट करत असल्याचे लोकांना वाटते. पण, जेव्हा त्यांना

हेही वाचा-राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर

ABOUT THE AUTHOR

...view details