महाराष्ट्र

maharashtra

Dabbawala Bicycle Tiranga Rally मुंबईच्या डबेवाल्यांनी काढली सायकलवरून तिरंगा रॅली

By

Published : Aug 13, 2022, 7:04 PM IST

मुंबईतील जगप्रसिद्ध डबेवाल्यांनीही सायकलवरून तिरंगा रॅली Dabbawala Bicycle Tiranga Rally काढली. अंधेरी रेल्वे स्टेशन बाहेर ही तिरंगा रॅली काढण्यात आली.

Independence Day 2022
मुंबई डबेवाला सायकल तिरंगा रॅली

मुंबई स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील जगप्रसिद्ध डबेवाल्यांनीही सायकलवरून तिरंगा रॅली Dabbawala Bicycle Tiranga Rally काढली. अंधेरी रेल्वे स्टेशन बाहेर ही तिरंगा रॅली काढण्यात आली.

येत्या सोमवारी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पातळीवर तयारी सुरू आहे. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी असल्याने या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानिमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. यात मुंबईतील डबेवाले यांनीही सहभाग घेतला. डबेवाले यांनी सायकलवरून तिरंगा रॅली काढली.

ABOUT THE AUTHOR

...view details