महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्ण वाढ सुरूच; रविवारी १२३ नव्या रुग्णांची नोंद, तर एकही मृत्यू नाही

By

Published : May 8, 2022, 7:05 PM IST

मुंबईत आज रविवारी १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Todays Corona Death In Mumbai ) झाली आहे. तर सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८१५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत वाढ होऊन १००च्यावर रुग्णसंख्या आढळून येत आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in Patients ) होऊन गेले काही दिवस ५०च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत वाढ होऊन १००च्यावर रुग्णसंख्या आढळून येत आहे. आज रविवारी १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Todays Corona Death In Mumbai ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८१५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

आज १२३ नवे रुग्ण -मुंबईत आज रविवारी १२३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८१५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६४९४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१० टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १२३ रुग्णांपैकी ११९ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार ९५९ बेड्स असून त्यापैकी २४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहून अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४, १ मे ला ९२, २ मे ला ५६, ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७, ७ मे ला १७२, ८ मे ला १२३ रुग्णांची नोंद झाली आहे.

७९ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ७९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Sanjay Raut Criticized PM Modi : 'ज्या प्रकारचे इव्हेंट हिटलर करायचा, तसेच इव्हेंट आता पंतप्रधान मोदी करत आहेत'

ABOUT THE AUTHOR

...view details