महाराष्ट्र

maharashtra

रामदास आठवलेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

By

Published : Jun 7, 2022, 3:29 PM IST

राज्यसभेबरोबर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला भेटत आहे. सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असून आमदारांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मुंबई- राज्यसभेबरोबर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला भेटत आहे. सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असून आमदारांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

धनंजय महाडिक विजयी होणार.? -या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. भाजपचा तिसरा उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचा आहे. भाजपने या निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप व आम्ही सर्व पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविकासआघाडीवर नाराज असलेले पाच आमदार भाजपसोबत यायला काहीच हरकत नाही, असेही ते म्हणाले. कशा पद्धतीने पहिल्या पसंतीची मत दिल्यानंतर जी काही मत उरतात त्यात अपक्ष व लहान पक्ष यांच्या आमदारांना पाठीशी घेऊन कुठल्याही परिस्थितीत धनंजय महाडिक यांचा विजय होणार, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर एमआयएम व समाजवादी पक्षाच्या आमदारांची मतेही भाजपला भेटण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

आमदार बदलले, हॉटेल बदललं..? -रामदास आठवले म्हणाले, येणारी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला योग्य त्या जागा दिल्या जाव्यात याबाबतही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. चंद्रकांत पाटील यांनीही आरपीआयला योग्य त्या जागा दिल्या जातील, असे सांगितल्याचे आठवले म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सर्व आमदारांना अगोदर मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे ठेवले होते. परंतु आता त्यांनी हॉटेल बदलले आहे. या प्रश्नावर रामदास आठवले यांना विचारले असता, त्यांचे आमदार बदलले असल्याने त्यांनी हॉटेल बदलले आहे. कारण मते फुटण्याची भीती शिवसेनेला जास्त आहे, असा टोला सेनेला लगावला.

कोरोना वाढीस जनता जबाबदार -महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी दिल्लीतून येणारे लोक जबाबदार आहेत, असे वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आठवले म्हणाले, हे अतिशय चुकीचे वक्तव्य आहे. प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे. कोरोना सध्या वाढत आहे, याला जबाबदार नागरिकही आहेत. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेने याची दखल घेतली पाहिजे व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा -Railway earns Rs 57crore : मध्य रेल्वेने भंगारातून कमावले ५७ कोटी २९ लाख रुपये !

ABOUT THE AUTHOR

...view details