महाराष्ट्र

maharashtra

Shalini Thackeray : 'तर मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा मोडीत...'; शालिनी ठाकरेंचं आवाहन

By

Published : Aug 7, 2022, 4:53 PM IST

भंडारा येथील महिला अत्याचाराच्या ( Bhandara Rape Case ) घटनेच्या पार्श्वभूमीवर शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा राज्यातील महिलांना मोडीत काढावी लागेल, असं शालिनी ठाकरेंनी म्हटलं ( Shalini Thackeray On Cm Eknath Shinde ) आहे.

cm eknath shinde Shalini Thackeray
cm eknath shinde Shalini Thackeray

मुंबई -रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यातच भंडारा येथील महिला अत्याचाराच्या घटनेमुळे ( Bhandara Rape Case ) महाराष्ट्राची मान शर्माने खाली गेली आहे. त्यामुळे 'बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत. अन्यथा, मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा राज्यातील महिलांना मोडीत काढावी लागेल,' असं थेट आवाहन मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलं ( Shalini Thackeray On Cm Eknath Shinde )आहे.

काय म्हणाल्या शालिनी ठाकरे? -भंडारा येथील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून अनेकांनी राज्य सरकारवर देखील टीकेची झोड उठवली. त्यातच शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे आवाहन केलं आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शालिनी ठाकरे म्हणतात की, "भंडारा येथील पीडित महिलेला आता पाच शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बलात्कार रोखण्यासाठी तसेच बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावलं उचलावीत. अन्यथा, मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा महिलांनाच मोडीत काढावी लागेल," असे मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं.

नेमकी काय आहे घटना? -महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर नग्नावस्थेत तिला रस्त्याच्या कडेला फेकून नराधमांनी पळ काढला. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, 'पुलाजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्या महिलेला रुग्णालयात पाठवले. सदर महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पीडित महिलेला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.'

तीन पैकी दोन आरोपी अटकेत - या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, या आरोपींना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी, अशी अटक करून चौकशी करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव ते लाखनीपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तीन आरोपींपैकी एक अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडितेवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, रक्षाबंधनाचा सण आठवडाभर आला असताना भंडारा जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने झुकली. अमानुष बलात्कार, अत्याचारामुळे अति रक्तस्राव झाल्याने या पीडित महिलेला आता पाच शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणाचा आणखी तपास भंडारा पोलीस करत आहेत.

हेही वाचा -MNS Vs Governor Koshyari : 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details