महाराष्ट्र

maharashtra

'त्या' 739 मराठा उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा- ऊर्जा राज्यमंत्री

By

Published : Feb 13, 2021, 9:56 AM IST

शुक्रवारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच लवकरात लवकर 739 विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून सामान्य प्रशासनाने महावितरणला काही मार्गदर्शन सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे एसईबीसीच्या बहुतांश उमेदवारांना नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला असल्याची माहिती मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मराठा समाजातील उमेदवारांना दिली आहे.

मंत्री प्राजक्त तनपुरे
मंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयात स्थगिती दिल्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 739 मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 24 दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. शुक्रवारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच लवकरात लवकर 739 विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून सामान्य प्रशासनाने महावितरणला काही मार्गदर्शन सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे एसईबीसीच्या बहुतांश उमेदवारांना नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला असल्याची माहिती मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मराठा समाजातील उमेदवारांना दिली आहे.

मंत्री प्राजक्त तनपुरे

उमेदवारांना नियुक्तीचा मार्ग मोकळा-

राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या दोन बैठकीमध्ये मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबद्दल चर्चा झालेली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील सामन्य प्रशासन विभागाला सर्व घटकांतील उमेदवारांना न्याय मिळेल, असे आदेश निर्गमित करावेत, अशा सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सामान्य प्रशासनाने महावितरणला काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महावितरणने त्यांच्या स्वीकार करून 'एसईबीसी'च्या बहुतांश उमेदवारांना नियुक्तीचा मार्ग मोकळा केलेला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

24 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन-

मराठा आरक्षणाला स्थागिती मिळण्यापूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मुंबई मेट्रो, तलाठी, महावितरण, महानिर्मिती, स्टेट बोर्ड, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध विभागातील निवड झालेल्या एकूण 739 मराठा उमेदवारांच्या नियुक्त रखडलेल्या आहेत. हे सर्व उमेदवार परीक्षेत पात्र ठरले असून या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. मात्र तत्पूर्वीच्या तरुणांना नियुक्ती का दिली जात नाही? याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यांत नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग 739 मराठा तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करीत आहे, असा सवाल उमेदवार तरुणांनी केला. तसेच अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना देण्याची मागणी करत गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

नियुक्ती पासून वंचित-

एमएमआरडीए प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या 9 सप्टेंबर 2012 च्या जाहिरातीनुसार सीईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची परिक्षेद्वारे निवड करण्यात आली व एमएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आणि त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांचे जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात कागदपत्र पड़ताळणी प्रक्रिया सुध्दा पुर्ण करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. काही उमेदवार नियुक्ती घेऊन हैदराबाद येथे प्रशिक्षणास गेले त्यात सुद्धा सीईबीसी उमेदवारांचाही समावेश होता.परंतू कोविड-19 या जागतिक महामारीच्या संकटामुळे सर्व प्रक्रिया ठप्प झाली. आणि ठप्प झालेली प्रक्रिया पुन्हा 15 सप्टेंबर 2020 पासून सुरु करण्यात आली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सप्टेंबर रोजी आलेल्या मराठा आरक्षण स्थगितीच्या निर्देशानुसार आम्हा सर्व सीईबीसी उमेदवारांना नियुक्ती पासून वंचित ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details