महाराष्ट्र

maharashtra

कोणत्याही धर्माचा असो कारवाई होणारच - मंत्री अस्लम शेख

By

Published : May 1, 2022, 5:03 PM IST

"औरंगाबादमध्ये राज ठाकरे सभा ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) घेत आहेत. त्यांच्या सभेवरून मुस्लिम समाजाने भडकण्याचे काही कारण नाही. एखादा माणूस आपले हरवलेले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप नसावा. मात्र, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कडक कारवाई करणारच मग तो कोणत्याही धर्माचा असो", असे मंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Shaikh ) म्हणाले.

मंत्री अस्लम शेख
मंत्री अस्लम शेख

मुंबई - आज ( एक मे ) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा 62 वा वर्धापन दिन ( Maharashtra Day 2022 ) असून यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यासोबतच औरंगाबादमध्ये मात्र राजकीय वातावरण तापले आहे. तणाव निर्माण करणारे कोणत्याही धर्माचे असोत त्यांच्यावर कार्यवाही होणारच, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Shaikh ) यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलत ते होते.

बोलताना मंत्री अस्लम शेख
हरवलेले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न -"औरंगाबादमध्ये राज ठाकरे सभा ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) घेत आहेत. त्यांच्या सभेवरून मुस्लिम समाजाने भडकण्याचे काही कारण नाही. एखादा माणूस आपले हरवलेले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप नसावा. मात्र, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कडक कारवाई करणारच मग तो कोणत्याही धर्माचा असो", असे मंत्री अस्लम शेख म्हणाले.

भाजपवर निशाणा -"संयुक्त महाराष्ट्राच्या स्मृती दालनावरून भाजपने टीका केली. पण, त्यांच्या टीकेला आम्ही महत्त्व देत नाही. कारण, भाजपच्या नेत्यांनी येथे यावे व येथे झालेली काम पहावीत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन येथील कलादालनाचा आढावा घेतला आहे. भाजपच्या नेत्यांनी येथे यावे, पाहणी करावी आणि नंतरच आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.", अशी प्रतिक्रिया मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

हेही वाचा -Chandrakant Khaire on MNS rally : मनसेची सभा स्पॉन्सर्ड, शिवसेनेचे पानीपत कोणी करू शकत नाही - चंद्रकांत खैरे

ABOUT THE AUTHOR

...view details