महाराष्ट्र

maharashtra

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : एनआयएने तपासले 800 सीसीटीव्ही फुटेज

By

Published : Apr 13, 2021, 11:02 AM IST

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आतापर्यंत तब्बल 800 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यातून निलंबित अधिकारी सचिन वाझेंविरोधात ठोस पुरावे एनआयएने गोळा केले आहेत.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : एनआयएने तपासले 800 सीसीटीव्ही फुटेज
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : एनआयएने तपासले 800 सीसीटीव्ही फुटेज

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आतापर्यंत तब्बल 800 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यातून निलंबित अधिकारी सचिन वाझेंविरोधात ठोस पुरावे एनआयएने गोळा केले आहेत.

800 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

या प्रकरणात एनआयएने पुरावे म्हणून तब्बल 800 सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत पडताळले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 40हून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यापैकी 8 जणांना साक्षीदार केल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. या तपासातून एनआयएने वाझेंविरोधात ठोस पुरावे ताब्यात घेतले आहेत.

रियाजुद्दीन काझींचीही चौकशी

याशिवाय नुकतेच निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी यांचीही चौकशी एनआयएकडून केली जात आहे. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण गुन्ह्यामागचा हेतू काय हे एनआयएचे अधिकारी समजून घेत आहेत. काझींच्या चौकशीतून समोर येणाऱ्या गोष्टींची पडताळणी एनआयएचे अधिकारी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details