महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis : - आमच्या नेत्यांना 'ईडी'चा दम दिला जातो आहे; अजय चौधरी यांचा आरोप

By

Published : Jun 27, 2022, 4:36 PM IST

Updated : Jun 29, 2022, 12:09 PM IST

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत ( Shiv Sena rebel MLA ) बोलताना कोर्ट जो निर्णय घेतील त्यावर मी काय बोलू शकत नाही. आमचे वकील बाजू मांडत आहेत. संजय राऊत यांना ईडीची नोटीस ( ED notice to Sanjay Raut ) देण्यात आली आहे. तपास यंत्रणांची भीती ( Fear of the investigative mechanism) दाखवली जाते आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. जे आमदार गुहाटीला गेले आहेत त्यांच्याबाबत बोलताना, यांच्याकडे गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो असा टोला शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी ( Ajay Chaudhary ) यांनी लगावला आहे. या प्रकरणानंतर केंद्रीय तपस नियंत्रणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवायांपैकी किती आमदारांवरच्या कारवाया थांबल्या हे समोर येईल. पुढे जे काय होईल ते आम्ही पाहून घेऊ असे चौधरी म्हणाले.

Ajay Chaudhary
अजय चौधरी

मुंबई - राज्यात सध्या राजकीय भूकंप ( Maharashtra Political Crisis ) झाला आहे. शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार बंडखोरी ( MLA rebels ) करून गुहाटीला गेले आहेत. यावर बोलताना यांच्याकडे गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो. असा, टोला शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी ( Ajay Chaudhary) यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे. सरकारचा पाठींबा काढण्याचे पत्र कोणाला द्यायचे यांना माहीत नाही का? असे म्हणत चौधरी यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाची खिल्ली उडवली आहे. मुंबई महापालिकेत गणेशोत्सव संदर्भात आयोजित बैठकीनंतर अजय चौधरी पत्रकारांशी बोलत होते.

वाल्याचे वाल्मिकी होतात -शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत बोलताना कोर्ट जो निर्णय घेतील त्यावर मी काय बोलू शकत नाही. आमचे वकील बाजू मांडत आहेत. संजय राऊत यांना ईडीची नोटीस देण्यात आली आहे. तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. जे आमदार गुहाटीला गेले आहेत त्यांच्याबाबत बोलताना, यांच्याकडे गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो असा टोला चौधरी यांनी लगावला आहे. या प्रकरणानंतर केंद्रीय तपस नियंत्रणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवायांपैकी किती आमदारांवरच्या कारवाया थांबल्या हे समोर येईल. पुढे जे काय होईल ते आम्ही पाहून घेऊ असे चौधरी म्हणाले.

पत्र कोणाला द्यायचे हे माहित नाही का -दरम्यान, आज एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात सरकारचा पाठिंबा काढण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना सरकारचा पाठिंबा काढण्याचे पत्र कोणाला दिले जाते हे त्यांना माहीत नाही का. त्यांचा अभ्यास कमी आहे. असे म्हणत शिंदे गटाची चौधरी यांनी खिल्ली उडवली आहे.


हेही वाचा -Live Maharashtra Political crisis : बंडखोर मंत्र्यांंना दुय्यम खात्यांच वाटप, मंत्रिमंडळात फेरबदल

Last Updated :Jun 29, 2022, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details