महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Breaking News : पूरग्रस्त गडचिरोलीला सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 11, 2022, 6:29 AM IST

Updated : Jul 11, 2022, 9:34 PM IST

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेक्रिंग न्यूज

21:32 July 11

अल्पवयीन मुलीला धमकी प्रकरणी एकाला जम्मूमधून अटक

उदयपूरमधील कन्हैया कुमारच्या हत्येबाबत आपले मत व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने जम्मू-काश्मीरच्या बडगाममधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी : मुंबई पोलीस

18:36 July 11

पूरग्रस्त गडचिरोलीला सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्याकरिता नागपूरवरून रवाना झाले.

17:01 July 11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; पंतप्रधानांबद्दल केले होते विधान

28 जुलैपर्यंत मानहानीच्या खटल्यात हायकोर्टातील सुनावणी स्थगिती

गिरगाव महानगर दंडाधिकारी कोर्टातील खटल्यात 28 जुलैपर्यंत सुनावणी न घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख "चौकीदार चोर है" असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीचे प्रकरण

16:31 July 11

पावसामुळे निवडणुका पुढे ढकलल्या तर ओबीसी आरक्षणासाठी ते फायदेशीर - चंद्रकांत पाटील

पावसामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास राजकीय ओबीसी आरक्षणासाठी ते फायदेशीर ठरेल, असा आमचा विश्वास आहे. कारण त्यासाठी आणखी वेळ मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

15:02 July 11

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाचा झटका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाचा झटका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाचा झटका

शंभर कोटी कथित वसुली प्रकरण

अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला

13:12 July 11

मायकेल लोबो यांना गटनेतेपदावरून काढण्यासाठी देण्यात येणार पत्र

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले, की मायकेल लोबो यांना काढून टाकण्यासाठी बैठकीच्या ठरावासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना सादर केले आहे. आमचा नवा गटनेता आजपर्यंत फायनल होईल. आम्ही तो सादर करू. आमच्यासोबत 6 आमदार आहेत. अजून एक अपेक्षित आहे. एकूण 7 आमदार आहेत.

13:11 July 11

राष्ट्रवादीचे आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बोलावली शरद पवार यांनी बैठक

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संग्रामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची उद्या 12 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर इथेही बैठक होणार आहे. उद्या पुन्हा एकदा आपल्या सर्व आमदारांशी शरद पवार बैठक घेणार आहेत. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही आपल्या सर्व आमदारांची बैठक शरद पवारांनी घेतली होती. बैठकीच्या माध्यमातून आपल्या आमदारांची मतं शरद पवार यांनी ऐकली.

13:05 July 11

सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा फेटाळला अर्ज

100 कोटी कथित वसुली प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर तीन आरोपींचा डिफॉल्ट जामिनाचा अर्ज आज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. सीबीआयने एप्रिल महिन्यात या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली होती

12:23 July 11

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ, अनेक मंदिरे गेली पाण्याखाली

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

12:00 July 11

सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला अपेक्षा होती- बाळासाहेब थोरात



१६ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या १६ आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. जोपर्यंत नवीन घटनापीठ स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

11:27 July 11

विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवापूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची सतत धार सुरू आहे.

10:06 July 11

काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार

राज्यात सध्या मागच्या दोन दिवसापासून काँग्रेसचे आमदार बंडाच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या काँग्रेसचे 11 आमदार असून त्यातील सहा आमदार भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. मात्र अद्याप पाच आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना रात्रीच अज्ञातस्थळी हलवले आहे. आता हे काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुकुल वासनिक आज दुपारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत.

09:47 July 11

कोल्हापुरात डॉक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; फुटपाथवर आढळला मृतदेह

कोल्हापूर - कोल्हापूरातील डॉ. अपूर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (वय 30, रा. ताराबाई पार्क) यांनी आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली. हातामध्ये इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच हे नेमके कसले इंजेक्शन होते याबाबतही अद्याप स्पष्ट झाले नसून आत्महत्या करण्यामागचे कारणही पोलीस शोधत आहेत. कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे यांची ती मुलगी आहे.

09:34 July 11

सर्वोच्च न्यायालयातील याचिका म्हणजे... संजय राऊत यांनी केले ट्विट

शिंदे सरकारचा फैसला ठरविणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले, की प्रश्न शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा नाही. लोकशाहीच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न आहे. 'मुक्त आणि निष्पक्ष' न्यायव्यवस्थेसाठीही ही मोठी परीक्षा आहे....!

09:15 July 11

हिंगणा जिल्ह्यातील नाल्याच्या पुरात आजीसह नात गेली वाहून..

भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात आजी आणि त्यांची १५ वर्षाची नात वाहून गेली आहे. आजीचा मृतदेह सापडला आहे. तर नातीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

09:03 July 11

...तर मनसेला आमचा विरोध असेल- रामदास आठवले

ठाणे- राज्यातील शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्री मंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच नसल्याचे म्हटले आहे. मनसे हा निवडणुकीत आमच्यासोबत नसल्याने त्यांना मंत्री पद देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तसा विचार होत असेल तर त्याचा विरोध करू असे मंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांगण्यात आले.

08:45 July 11

संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी

हिंगोली-कधी आक्रमक भाषणाने तर कधी ढसा ढसा रडल्याने सर्वांचे लक्ष बनलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगर यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. संतोष बांगर हे त्यांच्या भाषणाने नेहमीच चर्चेचा विषय ठरत असत, मध्यतरी बंडखोर अंदारांना रडून -रडून पुन्हा पक्षात येण्यासाठी विनंती करत असल्याचा त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. बांगर शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

08:24 July 11

नागपूर शहरातील अनेक भागात पाऊस, रिंगरोडवर साचले गुडघाभर पाणी

नागपूर - नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एकाबाजूचीवाहतूक बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला.

07:50 July 11

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा १३ जुलैला विस्तार होण्याची शक्यता

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा १३ जुलैला विस्तार होण्याची शक्यता. दरम्यान, शिवसेनेने प्रतोद नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

07:15 July 11

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची दिली ऑफर

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. ते नांदेड येथे बोलत होते. अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी गैरहजर राहून व उस्मानाबाद व औरंगाबादच्या नामांतरास पाठींबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे खासदार चिखलीकर म्हणाले. यावेळी बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत, असल्याचं सांगितले. ते म्हणाले की, माजी मंत्री अशोक चव्हाण हे शिंदे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी स्वतः सह जिल्ह्यातील चार आमदार गैरहजर ठेवून व औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामातरास पाठींबा देत अप्रत्यक्षरित्या भाजपाला पाठिंबाच दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तसेच ते जर भाजपात आले तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी स्वागत करेन, असे खासदार चिखलीकर म्हणाले आहेत. खासदार चिखलीकर यांच्या या ऑफरवर अशोक चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

07:05 July 11

चंद्रपूर जिल्ह्याकरिता पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

चंद्रपूर - भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे.

06:57 July 11

आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो - आमदार राजन साळवी

८ जुलैला विधानसभेत झालेल्या निवडीप्रसंगी व्हीपच्या विरोधात मतदान केल्यामुळे मला शिंदे गटाच्या त्यांनी निर्माण केलेले प्रतोद भरत गोगावले यांनी पत्र पाठवलेले आहे. तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये अशी नोटीस दिली आहे. याची आम्हाला पर्वा नाही. आमदारकी गेली तरी चिंता नाही. ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असं शिवसेना उपनेते, आमदार आमदार राजन यांनी शिवसेनेच्या रत्नागिरीतील निर्धार मेळाव्यात म्हटले आहे.

06:28 July 11

आषाढ वारीला आलेल्या नागपुरातील दोघा तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

सोलापूर-पंढरपूरात आषाढी एकादशीचा सोहळा सोमवारी मोठ्या त्साहात साजरा झाला. नागपूर जिल्ह्यातील तीन तरुण पंढरपूरला आषाढी वारीला विठ्ठलाच्या दर्शनासठी आले होते. यातील दोन तरुणाचा चंद्रभागा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा जि नागपूर) व विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी जि नागपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

06:12 July 11

Maharashtra Breaking News : मायकेल लोबो यांना गटनेतेपदावरून काढण्यासाठी देण्यात येणार पत्र

मुंबई- शिवसेनेच्यावतीने नियुक्त केलेल्या प्रतोदना अवैध ठरवत ( Shivsena petition against assembly Speaker ) एकनाथ शिंदे यांच्या गटाने नियुक्त केलेल्या प्रतोदच्या व्हीपला मान्यता देण्याच्या नवनिर्वाचित विधानसभा ( Supreme court on Maharashtra assembly Speaker ) अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाय या याचिकेवर आज सुनावणी घेणार आहे. हा निकाल शिंदे सरकार आणि शिवसेनेतील शिंदे गट आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ( हे ब्रेकिंग पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. )

Last Updated :Jul 11, 2022, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details