महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Breaking News : मुख्यमंत्री शिंदेंनी नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे केले अभिनंदन, म्हणाले, ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण

By

Published : Jul 21, 2022, 6:30 AM IST

Updated : Jul 21, 2022, 10:42 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

22:40 July 21

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे केले अभिनंदन, म्हणाले, ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, भारतातील महिला समुदायासाठी तसेच आदिवासी समाजासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

16:29 July 21

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

गणेशोत्सव मंडळाच्या समन्वय समितीसोबत बैठक झाली

कोरोना काळात इच्छा असूनही सण धुमधडक्या साजरे करता आले नाहीत

कोरोना काळाचे निर्बंध होते ते सर्व निर्बंध उठवले

गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम, पारसी हे सण शांततेत साजरे व्हावे यासाठी प्रशासनाला सूचना केल्या

मंडप परवानगासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यासाठी सूचना दिल्या

मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका तसेच राज्यातील सर्व प्रशासनाला आदेश दिले

राज्य सरकारने घालून दिलेले नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत

मुंबईच्या धरतीवरती राज्यातील ही सूचनांचे पालन करावे

कोरोना काळात गणेश मूर्तींच्या उंचीवरची मर्यादा होती तीही काढून टाकली

रस्त्यांवरती लाईट पूर्ववत करण्याच्या सूचना

मूर्तिकारांसाठी मूर्ती बनवण्यासाठी जागा आयडेंटिफाय करायचे आदेश दिले आहेत

मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी सहकार्य करणार

प्रदूषणावरती कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या केसेस काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत

दहीहंडी मंडळांसाठीही नियमावली तयार केली असून त्यांचे तंतोतंत पालन करण्यात येईल

16:21 July 21

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांसाठी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. यावेळी DCM देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.यावेळी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

15:17 July 21

मला पण शिंदे गटाकडून ऑफर, मात्र मी शिवसैनिक जाणार नाही - आमदार अंबादास दानवे

औरंगाबाद - मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. यावर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, तुम्ही जे माझ्यासाठी केले ते शिवसेना म्हणून केले. त्यामुळे मी शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.

13:29 July 21

आरेमधील कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उठवली

आरेमधील कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उठवली

आरे कारशेडचा मार्ग मोकळा

वर्षभरात काम पूर्ण करायचा प्रयत्न

फास्ट ट्रॅकवर प्रकल्प राबवणार

कारशेडवरील बंदी उठवत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे.

13:12 July 21

नागपुरात काँग्रेसची ईडी चौकशीविरोधात आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात

सोनिया गांधींविरोधात ईडीच्या चौकशी करण्यात येत आहेत. चौकशीच्या निषेधार्थ नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

13:01 July 21

मतमोजणीची प्रक्रिया संसदेत सुरू

राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया संसदेत सुरू झाली आहे.

12:29 July 21

सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

12:15 July 21

पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळाल्याने प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना - किरेन रिजिजू

पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळाल्याने केवळ आदिवासीच नाही तर देशातील प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना आहे. सर्व प्रमुख आदिवासी नेते नवीन राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी दिल्लीत येणार आहेत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

12:14 July 21

काँग्रेस कार्यकर्ते आणि एनएसयूआयचे आंदोलन

देशव्यापी निषेधाचा एक भाग म्हणून, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने समन्स बजावलेल्या सोनिया गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते आणि एनएसयूआयने आंदोलन केले.

12:10 July 21

संसदेतील काँग्रेस खासदार पक्षाच्या मुख्यालयाकडे रवाना

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्या ईडीसमोर हजर होण्यापूर्वी संसदेतील काँग्रेस खासदार 24, अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयाकडे निघाले.

11:21 July 21

कायद्यापुढे सगळे समान आहेत की नाही- प्रल्हाद जोशी यांची विरोधी पक्षांवर टीका

कायद्यापुढे सगळे समान आहेत की नाही? काँग्रेस अध्यक्षा (सोनिया गांधी) सुपर ह्युमन आहेत का? त्यांना (काँग्रेस) वाटते की ते कायद्याच्या वर आहेत..."... केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीनंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

11:16 July 21

राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

दिवसभराचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

10:49 July 21

संसदेत सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींची बैठक

संसदेत सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू यांचा समावेश आहे.

10:43 July 21

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

पावसाळी अधिवेशनानिमित्त विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचे प्रयत्न होणार आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), आययूएमएल, एनसी, टीआरएस, एमडीएमके, एनसीपी, डीएमके आणि आरजेडी या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

10:25 July 21

रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाची घेतली शपथ

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

10:13 July 21

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या!

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आज त्यांची आई सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर होणार आहेत.

09:51 July 21

काँग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीतील पक्ष कार्यालयात घोषणाबाजी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज ईडीसमोर हजर होणार्‍या पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना पाठिंबा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात घोषणाबाजी केली.

09:50 July 21

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वाजता सुरू होणार

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी संसदेत तयारी सुरू आहे

09:17 July 21

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात सर्व विरोधी पक्षांची होणार बैठक

लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज संसदेतील राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात होणार आहे.

08:25 July 21

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले संजय राऊत म्हणतात...

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपण कशालाही घाबरत नसल्याचे दर्शविले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है ! __ ओशो जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र!

07:45 July 21

राष्ट्रवादीच्या केवळ राष्ट्रीय पातळीवरील सेल बरखास्त, राज्यात कोणताही बदल नाही

राष्ट्रवादीने केवळ राष्ट्रीय पातळीवरील सेल बरखास्त केल्या आहेत. त्याचा राज्यातील कोणत्याही सेलवर परिणाम अथवा बदल होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे

07:40 July 21

द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावात विजय साजरा करण्याची तयारी

राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावात विजय साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. गावात मिठाई तयार करण्यात आली आहेत. तसेच विजयी मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

06:58 July 21

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि पक्षाचे खासदार एआयसीसी कार्यालयात जमणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर दिल्ली पोलिसांनी AICC मुख्यालयाच्या परिसरात बॅरिकेड्स लावले आहेत.

06:41 July 21

जगभरात मंकीपॉक्सचे 14,000 रुग्ण

जागतिक आरोग्य संघटेच्या माहितीनुसार जगभरात मंकीपॉक्सचे 14,000 रुग्ण आहेत. या रोगामुळे आफ्रिकेत 5 मृत्यूची नोंद झाली आहे, ही माहिती जागितक आरोग्य संघटनेने दिली आहे.

06:39 July 21

राष्ट्रवादीच्या सर्व सेल रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता राष्ट्रवादीचे सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त केले आहेत. असे ट्विट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

06:37 July 21

अमेरिका आणि चीनमधील ताण निवळणार

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी महिन्याच्या अखेरीस तैवान आणि व्यापारावरून दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील ताण निवळण्याची शक्यता आहे.

06:36 July 21

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये रस्ता बंद

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे पिथौरागढ जिल्ह्यातील थल-मुन्सियारी रस्ता बंद झाला.

06:20 July 21

Maharashtra Breaking News : आरेमधील कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उठवली

मुंबई- देशाचे १६ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा ( Presidential Election 2022 ) आज निकाल लागणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) उमेदवार आहेत. तर, विरोधकांकडून संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांच्यात सरळ लढत होत आहे. देशाला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. भाजप-शिंदे गटाने ( BJP Shinde group ) राष्ट्रपती पदासाठी मुर्मु यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेनेही मुर्मु यांना पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या आदेशानुसार सेनेच्या आमदारांनी मुर्मु यांना मतदान केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने यशवंत सिन्हा यांच्या पारड्यात मते टाकल्याचे समजते.

Last Updated : Jul 21, 2022, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details