महाराष्ट्र

maharashtra

Dilip Walse Patil on Sameer Wankhede : 'समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे'

By

Published : May 28, 2022, 4:11 PM IST

Updated : May 28, 2022, 4:25 PM IST

Dilip Walse Patil on Sameer Wankhede
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

र कोणी निरपराध व्यक्तीला फसवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते, असेही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. ( Dilip Walse Patil on Sameer Wankhede )

मुंबई - कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात चार्टशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चीट देण्यात आली आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ( Dilip Walse Patil on Sameer Wankhede ) आहे. ते म्हणाले की, आर्यन खानवरील आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. मला वाटते की केंद्रानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची माहिती दिली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे - जर कोणी निरपराध व्यक्तीला फसवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते, असेही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ( Cordelia cruise drugs case ) एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली ( NCB Clean Cheat To Aryan Khan ) आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीमार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज दोषारोपपत्र सादर करण्यात ( Cruise Drug Case Charge sheet ) आले होते. ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र होते. एकूण १० खंडांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे.




सहा हजार पानी आरोपपत्रात आरोपीवर दोषारोप ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात विशेष एनसीबी एसआयटी करत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुद्दत वाढवून दिली होती. एनसीबी एसआयटीतर्फे ९० दिवसांची मुद्दत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. २ ऑकटोबर २०२१ रोजी एनसीबीने क्रूज ड्रग पार्टीवर धाड टाकत कारवाई केली होती. कार्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणात एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय? :मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.

हेही वाचा -Menstrual Hygiene Day : मासिक पाळी स्वच्छता दिनी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन

Last Updated :May 28, 2022, 4:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details