महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Cabinet Expansion : पहिल्या मंत्रिमंडळात स्थान नाही, प्रताप सरनाईक नाराज असल्याची चर्चा

By

Published : Aug 9, 2022, 10:43 AM IST

Updated : Aug 9, 2022, 11:45 AM IST

Maharashtra Cabinet Expansion : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेल्या शिंदे सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्या आमदारांची वर्णी लागली नाही, असे आमदार नाराज झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री प्रताप सरनाईक यांची वर्णी लागणार नाही.

Pratap Sarnaik
Pratap Sarnaik

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु आज विस्तार तर बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागताना पाहायला मिळत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 18 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून 9, तर एकनाथ शिंदे गटातील 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

काही आमदार नाराज असल्याची चर्चा -मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्या आमदारांची वर्णी लागली नाही, असे आमदार नाराज झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रताप सरनाईक यांची वर्णी लागणार नाही. त्यामुळे हे दोन्ही आमदार नाराज असल्याच म्हंटल जातं आहे. यासोबतच अजूनही काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. आमदारांमध्ये नाराजी राहू नये. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करत आहेत.

नांदेड आणि हिंगोली दौऱ्या आटोपल्यानंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी घेतली. मात्र तेव्हाही आमदारांमध्ये नाराजी दूर झाली नाही. त्यामुळे आज सकाळी पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहात आमदारांची बैठक सुरू आहे. मात्र अद्यापही काही आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

अब्दुल सत्तार यांचेही नाव गुलदस्त्यात - टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव आल्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना स्थान दिले जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळात यांचा विस्तारात आपल्याला जागा नसल्याने अब्दुल सत्तार देखील नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच नाराज आमदार यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा आज ११ वाजता होणार शपथविधी

हेही वाचा -CWG 2022 CLOSING CEREMONY : राष्ट्रकुल स्पर्धांचा शानदार समारोप, 61 पदकांसह भारत चौथ्या स्थानावर

Last Updated :Aug 9, 2022, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details