महाराष्ट्र

maharashtra

CM Eknath Shinde : द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करणार - मुख्यमंत्री शिंदे

By

Published : Jul 14, 2022, 10:47 PM IST

Updated : Jul 15, 2022, 9:40 AM IST

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला २०० आमदार मतदार करणार तो दावा खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM Eknath Shinde On Presidential Election 2022 Droupadi Murmu ) म्हटलं.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मुंबई -एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज ( 14 जुलै ) मुंबई दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजप आमदार, खासदार तसेच शिंदे गटातील आमदारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ( CM Eknath Shinde On Presidential Election 2022 Droupadi Murmu ) केलं.

'ही निवडणूक मुर्मू जिंकतील' - मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केलेला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत. आदिवासी समाजाला या देशाच्या सर्वोच्च स्तरावर बसवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे स्वागत सर्वांनी केलेल आहे. काही लोकांनी जाहीरपणे केलं आहे. काही लोकांनी मनापासून केलं आहे. यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने द्रौपदी मुर्मू जिंकतील. ही निवडणूक आता फक्त एक औपचारिकता आहे. ही निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकलेलीच आहे, असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून भेटत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे १८ नगरसेवक शिंदे गटात - पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांनी आज आमच्या गटात प्रवेश केलेला आहे. हे सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार आहे. आज जो सर्वसामान्य माणूस आहे, जो नागरिक आहे त्याला आमची भूमिका व राज्यात स्थापन झालेले सरकार याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा भेटत आहे. आमची भूमिका राज्यातील सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याची आहे, त्यासाठी काहीही करावे लागेल तर करू.

'मंत्रिमंडळ विस्तार लवकरच' - अद्याप खासदाराबाबत माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. परंतु, जी आम्ही भूमिका घेतलेली आहे, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा भेटत आहे. त्याच आम्ही समर्थन करतो. लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. तुम्हाला उत्सुकता आहे, त्याप्रमाणे होईल. पण, जे काही बोलले जाते त्याच्यात काही तथ्य नाही. वस्तुस्थिती नाही. दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत. तर तो त्यांचा प्रश्न आहे. आमचं सरकार आम्ही व्यवस्थित चालवत आहोत. १६५ पेक्षा जास्त आमदार आमच्या सरकारकडे आहेत. लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना ५० हजार रुपये देण्याची मदत, पेट्रोल वरील टॅक्स ५ रुपये व डिझेलवर ३ रुपये कमी केले आहेत. अनेक योजना आहेत, नगर विकास याबाबत सुद्धा आमही निर्णय घेत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी बोलणे केलं'- 18 ते 19 वर्षापर्यंत सर्वांना मोफत बुस्टर डोस देण्यात येणार. आम्ही ग्रास रूट लेव्हलला काम करत आहोत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलणे केले आहे. अजित दादा म्हणतात संचालक पद रिक्त आहेत. मग ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना कोणी अडवले होते. प्रभाग रचना विषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, त्याचा योग्य तो विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा -Ajit Pawar Criticized Shinde Government : पेट्रोल डिझेलचे कमी केलेले दर अत्यंत तुटपुंजी स्वरुपाचे - अजित पवार

Last Updated :Jul 15, 2022, 9:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details