महाराष्ट्र

maharashtra

Breaking News : ...पण आमच्या लोकांनी आमचा विश्वासघात केला - आदित्य ठाकरे

By

Published : Jun 27, 2022, 6:24 AM IST

Updated : Jun 27, 2022, 9:50 PM IST

Live Maharashtra Political crisis
महाविकास आघाडी सरकार संकट

21:48 June 27

...पण आमच्या लोकांनी आमचा विश्वासघात केला - आदित्य ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचा विश्वासघात करतील असे अनेकांनी सांगितले पण आमच्या लोकांनी आमचा विश्वासघात केला. अनेक आमदार जे चौकीदार, रिक्षाचालक, पान दुकानदार होते - त्यांना आम्ही मंत्री केले. 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी त्यांना (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि त्यांनी नाटक केलं, आदित्य ठाकरे

20:27 June 27

'गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं'; गुवाहाटीत झळकले शिंदेंच्या समर्थनात बॅनर

आसाम - बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले बॅनर हे गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल आणि सोमनाथ मंदिरासमोरील मार्गावर लावण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार मुक्कामी आहेत. बॅनरवर "गर्व से कहो हम हिंदू हैं" आणि "शिंदे साहब हम आपके साथ हैं" असे लिहिले आहे.

19:35 June 27

शिवसेनेचे आणखी एक आमदार उद्या एकनाथ शिंदे गटात होणार सामील!

शिवसेनेचे आणखी एक आमदार उद्या एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

19:18 June 27

ही बंडखोरी नसून शिवसेनेच्या स्वाभिमानाची लढाई -आमदार दीपक केसरकर

गुवाहाटी (आसाम) - ही बंडखोरी नसून शिवसेनेच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी विचार करून भाजपसोबत नवी युती करावी. भाजप-शिवसेना युती महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या निकालाशी सुसंगत आहे, शिवसेना बंडखोर आमदार दीपक केसरकर

18:40 June 27

देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्यावर सुरू आहे.

18:05 June 27

शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला; शिंदेंनी शंभूराजे देसाई यांचा व्हिडिओ केला शेअर

सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला, याचे एक मनोगत मांडले ते खालीलप्रमाणे आहे… असे ट्वीट करुन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शंभूराजे देसाई यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

17:37 June 27

चंद्रकांत पाटलांसह भाजपाचे मोठे नेते देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेते LoP देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले.

17:25 June 27

शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची केली तोडफोड

गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या गोंदियातील कार्यालयाची आज शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

15:15 June 27

Breaking News : नोटीस बजावलेल्या आमदारांना दिलासा : 12 जुलैपर्यंत लेखी उत्तर देण्याची मुभा - सर्वोच्च न्यायालय

नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा : 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्याची मुभा - सर्वोच्च न्यायालय

15:01 June 27

पुढील सुनावणी 11 जुलैला

Breaking : शिंदेंच्या याचिकेवर विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, सुप्रिम कोर्टाचे आदेश

14:04 June 27

इतके आमदार एकनाथ शिंदेंसोबत का गेले, याचे सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज - श्रीकांत शिंदे

इतके आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले, याचे सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

13:49 June 27

मुंबईत वातावरण अनुकूल नसल्याने आम्ही हायकोर्टात गेलो नाही - शिंदे यांच्या वकिलाचे उत्तर

विधीमंडळ पक्षातील अल्पसंख्याक राज्य यंत्रणा उद्धवस्त करत आहे. आणि आमच्या घरांवर हल्ला करत आहे. आमचे शव आसाम येथून येतील असे ते म्हणाले आहेत. मुंबईत वातावरण अनुकूल नसल्याने आम्ही आमचे हक्क बजावू शकत नाही, असे उत्तर शिंदे यांच्या वकिलाने दिले.

13:47 June 27

तुम्ही हायकोर्टात का गेले नाही? न्यायालयाच्या प्रश्नाला शिंदेंच्या वकिलाने दिले 'हे' उत्तर

तुम्ही हायकोर्टात का गेले नाही? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल. त्यावर, कौल म्हणालेत की त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट, अपात्रता यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये आदेश दिले आहेत.

13:34 June 27

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुनावणी सुरू.

13:23 June 27

उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या विभागांमध्ये केले फेरबदल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या विभागांमध्ये फेरबदल केले जेणेकरून सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे दुर्लक्ष किंवा दुर्लक्ष होऊ नये, सीएमओची माहिती.

13:18 June 27

माझी मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही, मला अटक करा.. ईडीच्या समन्स नंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई -ईडीने समन्स बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.मला आताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या, मला अटक करा! जय महाराष्ट्र!

13:10 June 27

बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती

बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले असल्याची माहिती

एकदाच शिंदे यांच्याकडे असलेले नगर विकास खाते सुभाष देसाई यांच्याकडे दिले असल्याची माहिती

गुलाबराव पाटील यांच्या जवळील जलसंपदा हे अनील परब यांना देण्यात आले


दादा भुसे यांचे कृषी खातं हे शंकराव गडाख यांच्याकडे

उदय सामंत यांच्या कंडचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आदित्य ठाकरे


शंभूराजे देसाई यांचे खातं संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आला

यड्रावकर यांचे खातं विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आल

अब्दुल सत्तार यांचे खातं प्राजक्त तनपुरे यांच्याकडे

13:05 June 27

बंडखोर मंत्र्यांंना दुय्यम खात्यांच वाटप, मंत्रिमंडळात फेरबदल

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केला आहे.

12:41 June 27

सर्वात मोठी बातमी, शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचे समन्स

सर्वात मोठी बातमी, शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचे समन्स. उद्या हजर राहण्याचे आदेश.

12:38 June 27

एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले.

12:29 June 27

आमदार यड्रावकार यांच्या विरोधात शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन

आमदार यड्रावकार यांच्या विरोधात शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन.

12:23 June 27

एकनाथ शिंदेंचा दावा, 38 सदस्यांनी पाठिंबा काढल्याने आघाडी अल्पमतात

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या 38 सदस्यांनी पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास (एमव्हीए) आघाडीने सभागृहातील बहुमत गमावले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला.

12:10 June 27

महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठविल्याचा दावा

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे पत्र शिंदे गटाने राज्यपालांना पत्र दिल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडे ३९हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

11:57 June 27

मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपने 3 हजार कोटी खर्च केले - नाना पटोले

मुंबई - महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने 3 हजार कोटी खर्च केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी केला.

11:40 June 27

एकनाथ शिंदे गटाने सरकारचा काढून घेतला पाठिंबा- गटाचा याचिकेत दावा

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केल्याचे सूत्राने सांगितले आहे.

11:39 June 27

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मोठ्या राजकीय हालचाली

मुंबई- देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मोठ्या राजकीय हालचाली हालचाली सुरू आहेत.

11:32 June 27

एकनाथ शिंदे यांची याचिका दुपारी १२ नंतर सुनावणीला येण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर एकनाथ शिंदे यांची याचिका सुनावणीला येणार आहे. आज दुपारी 12 ते 12.30 नंतर याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

11:20 June 27

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा सवाल, छगन भुजबळ सत्तेत असल्याबाबत घेतला आक्षेप

मुंबई- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. या आमदारांचा व्हिडिओ शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

11:12 June 27

बंडखोर आमदार व मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश द्यावे, असीम सरोदे यांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई- बंडखोर आमदार व मंत्र्यांना मंत्रालयात हजर राहण्यासंदर्भात वकील असीम सरोदे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. बंडखोर आमदार व मंत्री हे गुवाहाटीमध्ये असल्याने जनतेचे प्रश्न व कामे रखडल्याची स्थिती आहे.

11:08 June 27

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी विधानभवनात दाखल

मुंबई- बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी विधानभवनमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे शिवसेना काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

11:06 June 27

सर्वोच्च न्यायालयात थोड्यात वेळात होणार सुनावणी, शिंदे गटाच्या याचिकेकडे देशाचे लक्ष

मुंबई- शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार आहे. या निकालावर शिंदे गट व महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

10:51 June 27

उदय सामंत फेसबुक लाईव्हद्वारे मांडणार भूमिका

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या गटात नववे मंत्री उदय सामंत हे सहभागी झाले आहेत. ते ११ वाजता फेसबुक लाईव्ह घेत भूमिका मांडणार आहेत.

10:51 June 27

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तेलंगणाच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी

मुंबई - राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी करत असताना भाजप त्यापासून दूर असल्याचे चित्र आहे. अशातच भाजपने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तेलंगणाच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येत्या काही दिवसांत बैठक होणार आहे.

10:40 June 27

माझे ट्विट गुवाहाटीमध्ये बसलेल्या लोकांसाठी - संजय राऊतांचा बंडखोरांवर निशाणा

मुंबई- मी गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात ते बाप बदलणाऱ्यांबद्दल बोलत आहेत. माझे ट्विट गुवाहाटीमध्ये बसलेल्या लोकांसाठी आहे. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, लोक पक्षासोबत खातात, पितात आणि मजा घेतात आणि नंतर बाप बदलतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

09:59 June 27

आज कायदेशीर लढाई, रस्त्यावरचीही लढाई होत राहील- संजय राऊत

मुंबई- बाप बदलण्याची भाषा माझ्या आधी गुलाबराव पाटलांनी केली. महाराष्ट्राची संपर्क तुटल्याने माझ्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढले. एकनाथ शिंदे हे आमच्या आजही जवळचे आहेत. आज कायदेशीर लढाई आहे. रस्त्यावरचीही लढाई होत राहील. उदय सामंत यांच्या जाण्याने धक्का नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

09:53 June 27

रावसाहेब दानवे म्हणतात..मी अजून २-३ दिवस विरोधीपक्षात!

मुंबई- टोपे साहेब, मी अडीच वर्षे केंद्रीय मंत्री आहे, तुम्ही राज्यमंत्री आहात, तुम्हाला जे करायचे आहे ते लवकर करा. मी अजून २-३ दिवस विरोधी पक्षात आहे, असे भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना येथे म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटात असताना रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापन करणार का, याबाबत चर्चा आहे.

09:34 June 27

शिंदे गटाची आज सकाळी १० वाजता गुवाहाटीत होणार बैठक, काय ठरणार?

मुंबई- सर्वोच्च न्यायालय आज बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबत निकाल देणार आहेत. याबाबत शिंदे गटाची आज सकाळी १० वाजता गुवाहाटीत बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटाकडून पुढील रणनीती ठरणार आहे.

09:29 June 27

संजय राऊत यांच्या तोंड उघडण्याने शिवसेनेचे नुकसान- मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघात सुरू केला आहे. दुसरीकडे शिवसेनेतील गळती सुरुच आहे. अशा परिस्थितीत भाजपचे समर्थक मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की जेव्हा संजय राऊत तोंड उघडतात, तेव्हा सेनेचा एक आमदार कमी होतो. मोहित कंबोज हे सातत्याने संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य करत असल्याचे आजवर दिसून आले आहे.

09:06 June 27

डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका- संजय राऊत

मुंबई- बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र! असा खोचक ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

08:48 June 27

फ्लोर टेस्ट मध्ये काय होईल ते होईल..पण शिवसैनिकांशीबरोबर रोड टेस्ट द्यावी लागेल- शिवसेना उपनेते सचिन अहिर

सचिन अहिर

पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक होत राज्यभर आंदोलन करत आहे. अशातच शिवसेनेकडून मेळाव्याचे आयोजन करत एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली जात आहे. फलोर टेस्टमध्ये काय होईल ते होईल. पण जेव्हा या आमदारांचा रोड टेस्ट होईल तेव्हा त्यांचा सामना शिवसैनिकांशी होईल, असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते सचिन आहीर यांनी दिला आहे.

08:26 June 27

मनसे देणार मदतीचा हात? आमदार एकनाथ शिदे यांची राज ठाकरे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा

मुंबई- शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली. शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत मनसेच्या एका नेत्याने पुष्टी दिली. .

08:19 June 27

शिंदे गटाकडे दोन तृतीयांश बहुमत, महाविकास आघाडीचे ठरणार भवितव्य

मुंबई- सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाने अपात्रतेविरोधात याचिका दाखल केली आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालायाच्या निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.

07:43 June 27

बंडखोर आमदारांबरोबर अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

मुंबई- गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत. या बंडखोर आमदारांबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले.

07:43 June 27

केंद्राकडून बंडखोरांना सुरक्षा दिल्यावरून सामनात टीका

मुंबई- केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

07:08 June 27

१७ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल - शिवसेनेच्या कायदेशीर टीमचा दावा

मुंबई- १७ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिवसेनेच्या कायदेशीर टीमचे अॅड. कामत यांनी दावा केला आहे.

06:43 June 27

भाजपच्या गटात जोरदार हालाचाली सुरू

मुंबई - भाजपचे नेते राम कदम आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते हे पहाटे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरून निघाले.

06:39 June 27

आम्हाला कापला तरी शिवसेना आणि बाळासाहेबांसोबत प्रतारणा करणार नाही- सुनील राऊत

मुंबई -मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आम्हाला कापला तरी शिवसेना आणि बाळासाहेबांसोबत प्रतारणा करणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुनील राऊत यांनी केले. आमच्या बदनामीचा डाव असल्याचेही ते म्हणाले.

06:32 June 27

एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर आज सकाळी 10:30 वाजता होणार सुनावणी, काय होणार निर्णय?

मुंबई- एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि महाविकास आघाडीच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.

06:10 June 27

Live Breaking Page : बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग केल्याची सूत्रांची माहिती

मुंबई- एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याकडून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका सुरु आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांनी एक नवा ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एक सवाल केला आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल शिंदे यांनी केला आहे. शिवाय यालाच विरोध म्हणून उचललेले हे पाऊल, आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर, असेही शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-Eknath Shinde Tweet : दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं?

सत्ता संघर्ष वाद आता सर्वोच्च न्यायालयात-महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी ( 27 जून ) सुनावणी होण्याची शक्यता ( shivsena rebel mla group filed petition in supreme court ) आहे.

संबंधित बातमी वाचा-Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या बंडखोर गटाची 'या' कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

बंडखोर अविश्वास ठरावाला सामोरे जाणार-बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपलं मतं मांडलं आहे. आणखी एक दोन आमदार आमच्या गटात सहभागी होती. त्यांच्या पाठिंब्याने आमचे संख्याबळ 51 पर्यंत जाईल. आम्ही 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन महाराष्ट्रात येऊ, असे केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. मात्र, प्रथम एकनाथ शिंदे गटाला मान्यात द्यावी. आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असेही केसरकरांनी म्हटलं ( MLAs Shinde camp ready floor test Say Deepak Kesarkar ) आहे

संबंधित बातमी वाचा-Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे आमदार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार - दीपक केसरकर

मागील काही दिवसांपासून राज्यात मोठं राजकीय नाट्य सुरु आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी 40 ते 50 आमदारांसह बंड केलं आहे. त्या आमदारांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये त्यांनी आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली ( Bhagat Singh Koshyari writes state DGP ) आहे.Maharastra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपाल कोश्यारी मैदानात; पोलीस महासंचालकांना पत्र

संबंधित बातमी वाचा-Maharastra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपाल कोश्यारी मैदानात; पोलीस महासंचालकांना पत्र

Last Updated : Jun 27, 2022, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details