महाराष्ट्र

maharashtra

सीएसएमटी कलबुर्गी एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत जाणार, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते विस्तारीत मार्गावरील रेल्वेला हिरवा झेंडा

By

Published : Sep 16, 2022, 7:01 PM IST

सीएसएमटी कलबुर्गी एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत जाणार
सीएसएमटी कलबुर्गी एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत जाणार ()

कलबुर्गी सोलापूर एक्सप्रेस आता कोल्हापूरमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणार आहे (Kalburgi Express expanded). रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीच्या विस्ताराचे उद्घाटन केले (Kolhapur to CSMT).

मुंबई -कलबुर्गी सोलापूर एक्सप्रेस आता कोल्हापूरमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणार आहे (Kalburgi Express expanded). रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीच्या विस्ताराचे उद्घाटन केले. या रेल्वेचा विस्तार केल्याने कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे (Kolhapur to CSMT).

कलबुर्गी ते सोलापूर ही रेल्वे यापूर्वी धावतच होती आणि प्रवाशांना सेवा देत होती. मात्र प्रवाशांच्या अनेक वर्षापासून मागणीनुसार रेल्वेने अखेर त्यावर निर्णय घेतला आहे. ही गाडी आता सोलापूरपर्यंत नाही आता कोल्हापूरपर्यंत येणार आहे. ती छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत धावणार आहे.



कर्नाटकामधून महाराष्ट्रात येणारे हजारो प्रवासी अनेकदा अडथळे आणि अडचणीमुळे येऊ शकत नसत. विशेष करून कर्नाटक सीमा भागात आणि महाराष्ट्र सीमा भागात कर्नाटक आणि मराठी बोलणारे नागरिक यांना ही ट्रेन अत्यंत सोयीची आहे. मात्र ती सोलापूर पर्यंतच येत होती. तसेच त्यापुढे मात्र तिचा प्रवास नव्हता. आता शासनाने हा निर्णय करून रेल्वे प्रवाशांना एक सुखद धक्का दिला आहे. आता ही गाडी कोल्हापूरपर्यंत येईल आणि पुढे ती छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकांपर्यंत धावणार आहे. याप्रसंगी मध्य रेल्वेचे उच्च अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी के के सिंग यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली.

रेल्वेच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय होत असते. अनेकदा लगतची गाडी नसल्याने प्रवाशांना दिवसभर किंवा रात्र-रात्र रल्वे स्थानकावर काढावी लागत असते. मात्र गाड्यांचा अशा प्रकारे विस्तार केल्याने प्रवाशांची गैरसोय टाळली जाणार आहे. याचा फायदा कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील प्रवाशांना होणार आहे. याच धर्तीवर इतरही काही रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. त्याप्रकारची मागणी राज्यातील नागिरकांनी केली आहे. त्याचाही रेल्वे मंत्रालयामार्फत विचार सुरू आहे. ज्या गाड्यांचा विस्तार करणे शक्य आहे. त्या गाड्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाचा राहणार आहे, अशी माहितीही यानिमित्ताने रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details