महाराष्ट्र

maharashtra

ST कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरावरील आंदोलन हे अशोभनीय वर्तन; आव्हाड-मुंडेंची प्रतिक्रिया

By

Published : Apr 8, 2022, 5:15 PM IST

गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन ( ST Worker Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. आपल्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST Worker Agitation At Sharad Pawar House ) जोरदार आंदोलन केले. यावर मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

jitendra awhad dhananjay munde
मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री धनंजय मुंडे

मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Residence) यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Protest) किंवा हल्लाबोल हे अतिशय अशोभनीय वर्तन आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि दशा बदलली आहे हे लक्षात येते. अतिशय घाणेरडे स्तरावर हे राजकारण चालले आहे. कामगारांना कुणी भडकवले अथवा यामागे कोण आहे याबाबत अद्याप काहीच सांगता येणार नाही. मात्र, जे झाले ते अयोग्य असल्याची प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्या घरी त्यांचे कुटुंबीय असतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे आव्हाड म्हणाले.

घरावर जाऊन आंदोलन करणे योग्य नाही - एखाद्या मागणीसाठी नेत्याच्या घरावर जाऊन आंदोलन करणे असा प्रकार आजपर्यंत महाराष्ट्रात कधी घडला नाही. न्यायालयाने एखाद्या बाबतीत जर निर्वाळा दिला असेल तर त्यानंतरही एखाद्या नेत्याच्या घराबाहेर जाऊन अशा पद्धतीचे आंदोलन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामागे नक्की कोण आहे याची चौकशी केली जाईल, पोलीस तपासात काही गोष्टी जर उघड झाल्या तर नक्की समजेल यामागे कोण आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण? - गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन ( ST Worker Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST Worker Agitation At Sharad Pawar House ) जोरदार धडक दिली. 'शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद' अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details