महाराष्ट्र

maharashtra

corona update today : कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण, मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद

By

Published : Jun 15, 2022, 9:09 AM IST

Updated : Jun 15, 2022, 9:33 AM IST

मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण आढळून येणारी इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेली मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली ( No sealed buildings in Mumbai ) नाही.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबई-कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण , २.०५ पॉझिटिव्हिटी दर ( corona cases in Maharashtra ) आढळला आहे. मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची ( New corona case new Mumbai ) नोंद होत आहे.

कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण २४ तासात आढळले आहेत. ५७१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण आढळून येणारी इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेली मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली ( No sealed buildings in Mumbai ) नाही. इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्याबाबत नव्या गाईडलाईनची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


म्हणून इमारती सील नाहीत -मुंबईत सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी ९६ ते ९७ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तरी भीतीचे कारण नाही. पालिकेचे त्यावर लक्ष आहे. नवीन नियमावली प्रमाणे २० टक्के घरांमध्ये रुग्ण आढळून आले तरच इमारत सील करता येते. या नियमावलीमुळे मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

लसींचे डोस घेण्याचे आवाहन-राज्यभरातल्या शाळा सुरू झााल्या आहेत. शाळेत मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही. मात्र, शाळेत येणाऱ्या या मुलांच्या कोरोनाच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे. त्याचबरोबर राज्यात सध्या 15 हजार कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. पण, रुग्णालयांमध्ये गर्दी नाहीये. हे सगळं लस घेतल्यामुळे झाले आहे. तरी ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही आहे. त्या लोकांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी राजेश टोपे यांनी केलं आहे.

हेही वाचा-Corona Cases Hike in Thane : ठाणेकरांवर कोरोनाचे सावट, जिल्ह्यात सक्रिय ९९२ रुग्णांची नोंद

हेही वाचा-Pune Corona : पुण्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; शहरात दररोज 60 ते 70 नवे रुग्ण

हेही वाचा-Rajesh Tope : शाळेतील मुलांच्या आरोग्यावर संस्थाचालकांनी लक्ष ठेवावे - राजेश टोपे

Last Updated :Jun 15, 2022, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details