महाराष्ट्र

maharashtra

ई टीव्ही भारत विशेष : मुंबईत सप्टेंबर महिन्यात खून, विनयभंग, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

By

Published : Oct 26, 2020, 8:16 PM IST

सप्टेंबर महिन्यात मुंबईत खून, विनयभंग, बलात्कार, वाहन चोरी व दंगलीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर मुंबईतील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

mumbai police
मुंबईत सप्टेंबर महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबई - कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर हळूहळू देशाची आर्थिक राजधानी मुंबई अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर हळूहळू मुंबई पूर्वपदावर येत आहे. यानंतर मुंबई शहरात मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेही समोर आले आहे.

मुंबईत सप्टेंबर महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये वाढ

हेही वाचा -अभिनेत्री पायल घोषचा राजकारणात प्रवेश.. हाती घेतला आरपीआयचा झेंडा

लॉकडाऊननंतर मुंबईतील एकूण गुन्हे -

सप्टेंबर महिन्यात मुंबई शहरात 14 खुनाचे गुन्हे घडले असून, खुनाचा प्रयत्न करण्याचे 23 गुन्हे घडले आहेत. 1 दरोड्याचा गुन्हा मुंबई शहरात घडलेला असून, चेन स्नॅचिंगचे 68 गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत . खंडणीचे 16 गुन्हे मुंबई शहरात घडले असून, रात्रीच्या वेळेस घरफोडी होण्याचे 176 गुन्हे घडले आहेत. तर, चोरीचे तब्बल 281 गुन्हे मुंबई शहरातील वेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. मुंबई शहरात वाहन चोरीच्या 293 घटना घडल्या असून, जखमी करण्याचे 329 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई शहरात सप्टेंबर महिन्यात 25 दंगली घडल्या असून, बलात्काराचे 78 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. विनयभंगाचे 199 गुन्हे तर इतर कलमांखाली 2019 गुन्हे सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत सप्टेंबर महिन्यांमध्ये 3532 गुन्हे मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत.

मुंबईत ऑगस्ट महिन्यात घडलेले गुन्हे

सप्टेंबरची तुलना ही ऑगस्टशी केल्यास ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई शहरात एकूण 3388 गुन्हे घडले होते. ज्यामध्ये 10 खुनाचे गुन्हे घडले असून, खुनाच्या प्रयत्नाचे 24 गुन्हे घडले होते. सप्टेंबर महिन्यात मुंबई शहरात 54 बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले होते. तर, विनयभंगाचे 129 गुन्हे नोंदवण्यात आले होते.

जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात घडलेले गुन्हे -

जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या काळातला मुंबई शहरात घडलेल्या मोठ्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास, तब्बल 40594 गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. यात खुनाचे 107 गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे 227 गुन्हे, दरोड्याचे 11 याबरोबरच गेल्या नऊ महिन्यात मुंबई शहरात 527 बलात्काराचे गुन्हे घडले असून, विनयभंगाचे 1317 गुन्हे घडले आहेत. गत वर्षीच्या जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2019 या काळामध्ये मुंबई शहरात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या ही त्या मानाने कमी आहे. या काळामध्ये मुंबई शहरामध्ये 29 हजार 968 गुन्हे घडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details