महाराष्ट्र

maharashtra

Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुप्तचर विभागाने तीन महिने आधीच दिला होता इशारा

By

Published : Apr 10, 2022, 7:40 PM IST

शरद पवार यांच्या ( Silver Oak Attack Case ) निवासस्थानी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार ( ) यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने पहिलेच संबंधित ( IB Warning In Silver Oak Case ) विभागाला दिली असल्याची बाब समोर आली आहे.

Silver Oak Attack Case
Silver Oak Attack Case

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारयांच्या ( Silver Oak Attack Case ) निवासस्थानी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात 103 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात ( ST Worker Arrest For Silver Oak Case ) आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांचे गुप्तचर यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने पहिलेच संबंधित विभागाला दिली असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त लावण्यात उशीर झाला, त्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तीन महिने आधीच दिला होता इशारा -साधारण तीन महिनेआधीच राज्य गुप्तचर विभागाने एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला होता. शरद पवारांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना देखील दिली होती. दरम्यान या सर्व सुचना झोन II चे DCP योगेश कुमार यांना देण्यात आल्या होत्या. तरीही सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता. या साऱ्या प्रकरणामध्ये मीडिया सिल्व्हर ओकवर पोहोचली. मात्र, पोलिसांना पोहोचायला उशीर का झाला, हा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

पोलिसांकडून निष्काळजीपणा -शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ल्या होणार ही माहिती मिळाल्यानंतर देखील पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांना अगोदर त्या ठिकाणी पत्रकार पोहोचले. मात्र पोलीस अधिकारी पोहोचले नसल्याने या कामांमध्ये निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीमध्ये एक नवी व धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने अशी घटना घडू शकते, असा इशारा आधीच दिला होता, अशी माहिती समोर येते आहे.

चौकशीसाठी समिती गठीत -शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला होणार ही माहिती गुप्तचर विभागाने दिली असतानासुद्धा संबंधित विभागाकडून का हलगर्जीपणा करण्यात आली आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात चौकशी करण्याकरिता पोलीस उपायुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. समिती गठित करण्यापूर्वीच सिल्वर ओक या परिसरातील पोलीस विभागाच्या हद्दीत येते, त्या विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उचलबांगडी देखील करण्यात आली आहे. मात्र, शरद पवार यांचा सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करण्यात आला, असा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

काय आहे प्रकरण -8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -Sharad Pawar In Amaravati : हिंदवी स्वराज्य सर्व जातींनी एकत्रित स्थापन केलेले राज्य - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details