महाराष्ट्र

maharashtra

मुंबई विद्यापीठात उभारले जाणार हिंदी भाषा भवन - नसीम खान

By

Published : Nov 17, 2021, 4:26 PM IST

मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हिंदी भाषा भवनाच्या निरमाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे या भवनाची निर्मिती लवकरच होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी दिली.

Naseem Khan
Naseem Khan

मुंबई - मुंबईमध्ये असलेल्या लाखो हिंदी भाषिकांसाठी मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये अन्य भाषांप्रमाणे हिंदी भाषा भवनही असावे असा निर्णय सन 2013-14 मध्ये तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पावले टाकली नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प गेल्या सहा-सात वर्षांपासून रखडला होता. अखेरीस राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन माजी मंत्री नसीम खान आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी या भवनाच्या निर्मितीबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.

नसीम खान
मुंबई विद्यापीठाच्या आवारात होणार हिंदी भाषा भवन -

2014 साली भूमिपूजन झालेल्या हिंदी भाषा भवनाच्या निर्माणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सांस्कृतिक राज्य मंत्री अमित देशमुख यांनी या हिंदी भाषा भवनाच्या निर्माणाला तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे भवन निर्माण होईल आणि हिंदी भाषिकांसाठी हिंदी भाषेच्या आणि इतर संबंधातील अभ्यासासाठी महत्त्वाचा केंद्र होईल, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. मुंबईतील लाखो हिंदी भाषिकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

हिंदी आणि गुजराती साहित्य अकादमीच्या निधीत वाढ -

राज्यात हिंदी आणि गुजराती भाषेच्या संवर्धनासाठी गुजराती साहित्य अकादमी आणि हिंदी साहित्य अकादमी कार्यरत आहे. मात्र या दोन्ही साहित्य अकादमींना 20 लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. हा निधी अत्यंत तुटपुंजा असून यामुळे भाषेच्या संवर्धनाच्या कामात अडथळा येत असल्याचे नसीम खान यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर देशमुख यांनी या निधीत वाढ करून हिंदी साहित्य अकादमी आणि गुजराती साहित्य अकादमीला भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे आश्वासन खान यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details