महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Rain Alert : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून यलो अलर्टचा इशारा

By

Published : Sep 13, 2022, 11:37 AM IST

राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 6 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं ( Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.(Weather Update Rain Alert)

mumbai
हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबई :मागच्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते मात्र काही दिवसांनंतर पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला होता. परंतु सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Weather Update Rain Alert) त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट ( Yellow alert warning ) जारी केला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, पुणे परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे.

हवामान विभागाकडून यलो अलर्ट

नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान : राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 6 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह जारी करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील इतर भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येत्या ४-५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान हवामान विभागाने केलं आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट :मुंबई आणि ठाणेसह दहिसर, बोरीवली, कांदीवली, मलाड,गोरेगाँव,अँधेरी,विलेपार्ले, सांताक्रुज ,खार, बान्द्रा, दादर,जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कांदिवली पोईसर नदीतही मुसळधार पाऊस पडत आहे, दूरवर अंधार आहे आणि नदीच्या आत थोडे पाणी साचले आहे.

हे जिल्हे वगळता राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता :हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारपासूनच राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details