महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Govinda Death मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 23, 2022, 6:53 AM IST

Updated : Aug 23, 2022, 7:42 AM IST

१९ ऑगस्टला दहीहंडी फोडताना संदेश दळवी हा २४ वर्षीय गोविंदा जखमी झाला होता. रात्री ११ च्या सुमारास त्याला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी २१ ऑगस्टला डामा डिस्चार्ज घेवून त्याला नानावटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. काल २२ ऑगस्टला संदेश दळवीचा रात्री ९ वाजता मृत्यू झाला आहे.

govinda dies of injuries during dahi handi in mumbai
मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई महानगरात मागील दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. मुंबईमधील विविध रुग्णालयात एकूण २२२ जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी एका गोविंदाचा आज मृत्यू Mumbai Govinda Death झाला आहे. संदेश दळवी असे या मृत गोविंदाचे नाव असून तो २४ वर्षाचा आहे.

मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

जखमी गोविंदाचा मृत्यूमुंबईमध्ये बामणवाडा विलेपार्ले पश्चिम येथे १९ ऑगस्टला दहीहंडी फोडताना संदेश दळवी हा २४ वर्षीय गोविंदा जखमी झाला होता. रात्री ११ च्या सुमारास त्याला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी २१ ऑगस्टला डामा डिस्चार्ज घेवून त्याला नानावटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. काल २२ ऑगस्टला संदेश दळवीचा रात्री ९ वाजता मृत्यू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे दहीहंडी हा सण साजरा झाला नव्हता. यंदा निर्बंध शिथिल केल्याने सर्व सण साजरे करा असे सांगत दहीहंडीच्या थरावर कोणतीही मर्यादा घालण्यात आली नव्हती. तसेच जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

२२२ गोविंदा जखमीमुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देवून उंच थर लावून सलामी देणे, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याच दरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत २२२ गोविंदा जखमी झाले होते. त्यांना सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Last Updated :Aug 23, 2022, 7:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details