महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis: बंडखोरांना सुरक्षा पुरवा; राज्यपालांचे पोलीस महासंचालक, आयुक्तांना पत्र

By

Published : Jun 26, 2022, 5:52 PM IST

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena Rebel MLA Eknath Shinde ) यांच्या गटाने बंडखोरी केल्याने राज्यात बंडखोर नेत्यांच्या घरावर, कार्यालयावर दगडफेक, जाळपोळ, तोडफोड ( Attacke On Rebel Leader House And Office ) अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशातच या सर्व बंडखोर आमदारांना, मंत्र्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी असं पत्र खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena Rebel MLA Eknath Shinde ) यांच्या गटाने बंडखोरी केल्याने राज्यात बंडखोर नेत्यांच्या घरावर, कार्यालयावर दगडफेक, जाळपोळ, तोडफोड ( Attacke On Rebel Leader House And Office ) अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशातच या सर्व बंडखोर आमदारांना, मंत्र्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी असं पत्र खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governors letter to provide security ) यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लिहिल असल्याची बातमी समोर आली आहे.

बंडखोरांविरुद्ध शिवसेना आक्रमक? -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये तापलेले असतानाच आता शिवसेनेने सुद्धा आर या पारची भूमिका घेतलेली आहे. सुरुवातीला नरमाईची भूमिका घेतलेली शिवसेना आता बंडखोरांविरुद्ध आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणात आता ही आक्रमकता स्पष्टपणे दिसून येत आहे. या कारणास्तव मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या बंडखोरांच्या घरांवर, कार्यालयावर, दगडफेक, तोडफोड, जाळपोळ असे प्रकार सुरू झाले आहेत. हे प्रकार सुरू होण्याअगोदरच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजकीय आकसातून समर्थकांची सुरक्षा काढली आहे, असा आरोप करत आमच्या कुटुंबियांना काही झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे जबाबदार असतील असे पत्र लिहिले होते ( Eknath Shindes twitte against shiv sena leaders ) होते. परंतु याला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कोणत्याही आमदारांचे संरक्षण काढलेले नसून मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले नाहीत असंही स्पष्ट केले होते.

राज्यपाल पुन्हा सक्रिय? -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा आजचा सहावा दिवस आहे. जसजसे हे दिवस वाढत आहेत, तसतशी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या बंडखोरांची संख्या ही वाढत आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोर आमदारांच्या, मंत्र्यांच्याविरोधात शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या सर्व बंडखोरांना व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आमदारांची त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे मुंबई तसेच राज्यात विविध ठिकाणी काही आमदारांच्या घरी केंद्रीय सुरक्षा ( सीआरपीएफ ) चे जवान तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे करोना झाल्याने चार दिवसाच्या हॉस्पिटल मधील उपचारानंतर आजच भगतसिंह कोश्यारी हे राजभवनामध्ये दाखल झाले. दाखल झाल्याझाल्या त्यांनी राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडींमध्ये दखल देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण पुन्हा सक्रिय झाल्याचा एक संदेश दिला आहे.

सुरक्षेबाबतीत काल झाली होती आढावा बैठक ? - राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काल विशेष बैठक बोलावली होती. त्यात सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांच्यासह सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त व उपायुक्त सुद्धा उपस्थित होते. शहरात ११ जून ते १० जुलै या कालावधीसाठी मुंबई पोलीस कायद्यांतर्गत जमावबंदीचे आदेश सुद्धा ३ जूनला देण्यात आले होते. त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश काल देण्यात आले आहेत.

हेही वाचा -Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details