महाराष्ट्र

maharashtra

OBC Reservation Amendment Bill : ओबीसी राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकावर राज्यपालांची सही

By

Published : Mar 11, 2022, 5:50 PM IST

ओबीसी राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकावर (OBC Political Reservation Amendment Bill) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari signature) यांनी सही केली आहे. राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई -राज्य सरकारने नुकतेच विधिमंडळात मांडलेल्या ओबीसी आरक्षण सुधारणा विधेयकावर (OBC Political Reservation Amendment Bill) अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari signature)यांनी सही केली आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वडेट्टीवार बोलत होते.

  • महानगरपालिकांच्या निवडणुका प्रस्तावित -

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलता याव्यात जेणेकरून प्रभाग पुनर्रचनेचा पुनर्रचनेसाठी योग्य कालावधी मिळेल. तसेच दरम्यानच्या काळात इम्पेरिकल डाटा तयार केला जाईल, त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागु शकेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

  • इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी पुन्हा नव्याने समिती गठीत -

ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी पुन्हा नव्याने समिती गठीत केली आहे. या समितीने आपले काम आजपासून सुरू केले असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. डेटा गोळा करण्यासाठी आणि प्रभाग पुनर्रचनेसाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याने निवडणुका त्यानंतरच घेतल्या जातील, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details