महाराष्ट्र

maharashtra

गोरगरीब कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली फुल गल्ली मस्जिद

By

Published : Apr 21, 2021, 8:38 PM IST

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू देखील होत आहेत. मात्र या संकट काळात मुंबईतील भेंडी बाजारील फुल गल्ली मस्जिद गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

गोरगरीब कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली फुल गल्ली मस्जिद
गोरगरीब कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली फुल गल्ली मस्जिद

मुंबई -वाढत्या कोरोना रुग्णांमुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू देखील होत आहेत. मात्र या संकट काळात मुंबईतील भेंडी बाजारील फुल गल्ली मस्जिद गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे. मस्जिद प्रशासकानी गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन वितरण सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण सुद्धा वाचले आहेत.

गोरगरीब कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली फुल गल्ली मस्जिद

निःशुल्क ऑक्सिजन वितरण-

भेंडी बाजारातील फुल गल्लीमध्ये असलेले एक मस्जिद व्यवस्थापन कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात कोरोना रुग्णाच्या मदतीला धावून आले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन मिळावे यासाठी मस्जिद व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मस्जिद प्रशासक अब्दुल रज्जाक दाऊद मंसूरी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, सध्या कोरोनाची ही दूसरे लाट खूप गँभीर आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची तात्काळ गरज भासत आहे. मात्र सध्या रुग्णालयात ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून अनेकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आम्ही गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी निःशुल्क ऑक्सिजन आम्ही मस्जिदतर्फे देत आहोत.

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक-

अब्दुल रज्जाक दाऊद मंसूरी यांनी सांगितले की, गेल्यावर्षीपासून कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी फुल गल्ली मस्जिद काम करत आहे. सध्या ऑक्सिजनच्या तुडतवडा आहे. त्यामुळे आम्ही गरजू कोरोना रुग्णांसाठी निशुल्क ऑक्सिजन देत आहोत. यासाठी नागरिकांना डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शनची चिट्टी आवश्यक आहेत. तसेच आम्ही ज्या रुग्णांना ऑक्सिजन देत आहोत त्या रुग्णांचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर लिहून घेत आहोत.

मस्जिदाना आवाहन-

या संकट काळात एकमेकांची मदत करावेत. तसेच तुमच्याकडे ऑक्सीजन सिलेंडर असेल त्याला अनावश्यक कारणासाठी घरी ठेवू नयेत. गरजू लोकांना ऑक्सीजन सिलेंडर द्यावेत, असे आवाहन मस्जिद प्रशासकानी नागरिकांना केले आहे. सध्या ऑक्सीजन सिलेंडर घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक तासन तास रांगा लावत आहेत. मुंबईच्या मुस्लिम बहुल क्षेत्रात लोकसंख्या लक्षात घेता मस्जिदांची संख्या सुद्धा समान आहे. फुल गल्ली मस्जिदच्या हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याचप्रमाणे इतरही मस्जिद प्रशासकाने अशा प्रकारचा गरजू लोकांना ऑक्सिजन वितरण केलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा-भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण 'ती' तडफड पाहून सोडले प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details